माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फी 2026 साठी माध्यम अधिस्वीकृतीची अंतिम मुदत 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवली


चित्रपट रसिक देखील प्रतिनिधी म्हणून नोंदणी करू शकतात आणि सिनेमाचे एक नवीन विश्व अनुभवू शकतात

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026 

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2026 साठी माध्यम अधिस्वीकृतीची अंतिम मुदत 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे.

गोव्यातील पणजी येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान आयोजित  या महोत्सवाचे वार्तांकन करू इच्छिणारे माध्यम प्रतिनिधी, पत्र सूचना कार्यालयाच्या  (PIB) अधिकृत 'ॲक्रिडिटेशन' (मान्यता) पोर्टलद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात.

पात्र माध्यम प्रतिनिधींनी सुधारित अंतिम मुदतीपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

नोंदणी लिंक: https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx

काही शंका/प्रश्न असल्यास, अर्जदार iffi.mediadesk@pib.gov.in वर संपर्क साधू शकतात.

मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींना महोत्सवातील विविध उपक्रमांमध्ये प्रवेश मिळेल, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • चित्रपट प्रदर्शन
  • पॅनेल चर्चा
  • चित्रपट निर्माते आणि चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद
  • नेटवर्किंगच्या संधी
  • महोत्सवाच्या वार्तांकनाशी संबंधित इतर उपक्रम

इफ्फीच्या गतवर्षीच्या, म्हणजेच 56व्या महोत्सवासाठी पोर्टलवर आधीच नोंदणी केलेल्या माध्यम प्रतिनिधींना त्यांची जुनीच माहिती (लॉगिन तपशील) वापरून लॉगिन करता येईल, आणि आवश्यकतेनुसार त्यांचे दस्तावेज अद्ययावत करता येतील.

आशियातील अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या 'इफ्फी' मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी लवकर अर्ज करा. या महोत्सवात तुम्हाला सिनेविश्वाला आकार देणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्याची, पडद्यापलीकडील कथांचा  शोध घेण्याची आणि चित्रपट निर्मिती, सर्जनशीलता व संस्कृतीच्या या उत्साही उत्सवाचा भाग बनण्याची संधी मिळेल.

याव्यतिरिक्त, माध्यम क्षेत्राशी संबंधित नाहीत, असे चित्रपटप्रेमीही 'इफ्फी'साठी 'प्रतिनिधी' म्हणून https://www.iffigoa.org/delegate-registration या लिंकद्वारे नोंदणी करू शकतात. याद्वारे ते 57  व्या 'इफ्फी' 2026  मध्ये सादर होणाऱ्या विविध चित्रपटांचा आणि इतर उपक्रमांचा आनंद घेऊ शकतात.

 

इफ्फीबद्दल

1952 मध्ये सुरू झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी हा दक्षिण आशियातील सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा चित्रपट सोहळा आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील 'नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' (एनएफडीसी) आणि गोवा राज्य सरकारची 'एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा' (ईएसजी) यांच्या वतीने संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील चित्रपटकर्मी,  दिग्गज कलावंत आणि नवोदित अभिव्यक्ती एकत्र येत असतात. गोव्याच्या उत्साही  वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मास्टरक्लास अर्थात दिग्गजांच्या कार्यशाळा आणि विशेष गौरव सत्रांच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कथा, भाषा आणि चित्रपट परंपरांचा गौरव केला जातो.

57व्या इफ्फी 2026 संदर्भातील अधिक माहिती आणि अद्ययावत तपशीलांसाठी https://www.iffigoa.org/  या संकेतस्थळाला भेट द्या.

 

* * *

(28/10/26) आशिष सांगळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329450) अभ्यागत कक्ष : 55