पंतप्रधान कार्यालय
अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मान जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
16 SEP 2026 8:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
प्रख्यात अभिनेते अनंत नाग यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे., अनेक दशकांपासून अनंत नाग जी यांनी आपला सहजसुंदर अभिनय, चतुरस्र आणि उत्कृष्ट कलागुणांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर, विशेषतः कन्नड चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवला आहे, असे मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.
पंतप्रधानांनी म्हटले की, त्यांना मिळालेला हा सन्मान अत्यंत यथोचित असून या रुपाने अनंत नाग जी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेले अत्यंत मोलाचे योगदान स्पष्ट झाले आहे. या विशेष क्षणानिमित्त त्यांनी या ख्यातनाम कलाकाराला शुभेच्छाही दिल्या.
मोदी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हणतात:
“प्रख्यात अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
अनेक दशके त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने, चतुरस्र, उत्कृष्ट प्रतिभेने भारतीय चित्रपटसृष्टीवर, विशेषतः कन्नड चित्रपटसृष्टीवर, ठळकपणे ठसा उमटवला आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी अनोखी खोली आणि अस्सलपणा आणला.
खऱ्या अर्थाने श्रेष्ठ कलाकाराचा हा अत्यंत यथोचित असा सन्मान आहे.
शैलेश पाटील/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311124)
अभ्यागत कक्ष : 12