माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सहा अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्त्या देऊन भारतीय सर्जक तंत्रज्ञान संस्था आणि नेटफ्लिक्स यांचे भारतीय कथाकथनकारांच्या पुढच्या पिढीला पाठबळ

Posted On: 26 AUG 2026 5:24PM by PIB Mumbai

मुंबई, 26 ऑगस्‍ट 2026

 

भारतीय सर्जक तंत्रज्ञान संस्था (आयआयसीटी) आणि नेटफ्लिक्स यांनी शंभर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्यांची घोषणा केली आहे. एक वर्ष कालावधीचे दोन पदविका अभ्यासक्रम आणि सहा महिने कालावधीचे चार अभ्यासक्रम अशा सहा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांना 80%पर्यंत आर्थिक पाठबळ पुरवले जाईल.

शिष्यवृत्ती उपक्रमांतील या सहा अभ्यासक्रमांमध्ये डिप्लोमा इन इंटरॲक्टीव्ह कॉमिक्स आणि सिक्वेन्शियल आर्ट्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स मास्टरी, सर्टिफिकेट्स इन व्हर्च्युअल आर्ट डिपार्टमेंट कंटेंट क्रिएशन, मिडिया टेक वर्कफ्लो, आर्ट ऑफ कॅरॅक्टर ॲनिमेशन, आणि ई-स्पोर्ट्स आणि गेमिंग व्यवस्थापन या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सरांडोस यांच्या दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या भेटीपाठोपाठ ही घोषणा करण्यात आली आहे. भारताकडे कथाकथनाची समृद्ध परंपरा तसेच सर्जनशील प्रतिभेचा असामान्य साठा आहे आणि यांचा उपयोग कार्यक्रम निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून देशाचे स्थान बळकट करण्यासाठी होऊ शकतो असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यानंतर नेटफ्लिक्स इंडिया कथाकथन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारताच्या ‘केशरी अर्थव्यवस्थे’चे महत्त्वाचे चालक ठरलेल्या ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) परिसंस्थेमध्ये उद्योगांसाठी समर्पक कौशल्यांनी पुढच्या पिढीतील कथाकथनकारांना सुसज्ज करण्यात मदत करून भारताच्या सर्जनशील प्रतिभा साठ्यामध्ये गुंतवणूक करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

भारतभरातील विद्यार्थी तसेच कार्यरत व्यावसायिकांसाठी या शिष्यवृत्त्या उपलब्ध असतील.

आयआयसीटीच्या व्हिज्युअल इफेक्ट्स मास्टरी आणि मिडिया टेक वर्कफ्लो अभ्यासक्रम नेटफ्लिक्सकडून मिळालेल्या सूचनांसह समकालीन उद्योग कार्यओघ आणि जागतिक मापदंडांना अनुसरून रचण्यात आले आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभाग सचिव तसेच आयआयसीटी मंडळाचे अध्यक्ष चंचल कुमार म्हणाले, “भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था आता एका निर्णायक वळणावर आली आहे. कथा निर्माण होण्याची पद्धत तंत्रज्ञानामुळे बदलली असून प्रतिभावंतांच्या पुढील पिढीला आकार देणाऱ्या संस्थांना देखील त्यानुसार विकसित व्हावे लागेल. भारतातील अमर्याद सर्जनशील प्रतिभा आणि जागतिक एव्हीजीसी-एक्सआर उद्योगाच्या वेगाने बदलणाऱ्या गरजा यांच्या दरम्यानचा सेतू म्हणून आयआयसीटीची परिकल्पना करण्यात आली आहे. हा सेतू उभारण्यात आघाडीच्या जागतिक उद्योगांशी भागीदारी हा महत्त्वाचा भाग आहे. अशा पद्धतीचे सहयोगी संबंध उद्योगांच्या ज्ञानाला वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात आणि भारतातील प्रतिभेला भविष्यातील सर्जनशील कार्यबळामध्ये विकसित करण्यात मदत करतात.

आयआयसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ,विश्वास देऊस्कर म्हणाले, “आयआयसीटी सारख्या संस्थांचा उद्देश केवळ कौशल्ये शिकवणे नसून, ज्या प्रकारे हा उद्योग विकसित होत आहे त्याच्याशी ही कौशल्ये समर्पक ठरतील याची सुनिश्चिती करून घेणे हा देखील आहे. नेटफ्लिक्सशी होत असलेला हा सहयोग उद्योगांचा तो दृष्टीकोन, थेट अभ्यासक्रमाच्या रचनेपासून आणि व्यावसायिक कार्यओघापासून विद्यार्थ्यांनी जे मापदंड पूर्ण करावेत अशी अपेक्षा आहे त्या मापदंडांपर्यंत पूर्णपणे आपल्या शैक्षणिक आराखड्यात समाविष्ट करतो. संरचित शिक्षणाला प्रत्यक्ष उद्योगांच्या सूचना आणि वित्तीय उपलब्धता यांच्याशी जोडून आपण प्रतिभेची एक अशी सशक्त पाईपलाईन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत जी भारताच्या वाढत्या सर्जक परिसंस्थेमध्ये योगदान देण्यासाठी तयार आहे.”

फिक्की एव्हीजीसी-एक्सआर मंचाचे अध्यक्ष मुंजाल श्रॉफ म्हणाले की फिक्की-आयआयसीटी-नेटफ्लिक्स सहयोगामुळे भारतातील एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी भविष्याबाबत सज्ज कार्यबळ उभारण्यासाठी उद्योगांशी सुसंगत प्रतिभा विकासाकडे वाटचाल करण्याचा टप्पा ओलांडता आला आहे.

आयआयसीटी हे भारताचे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि विस्तारित वास्तव (एव्हीजीसी-एक्सआर) क्षेत्राचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य सरकार, फिक्की आणि सीआयआय यांच्याशी केलेल्या भागीदारीतून आयआयसीटीची स्थापना झाली. ही संस्था सध्या मुंबईत, पेडर रोडवरील एनएफडीसी संकुलातून कारभार चालवत असून गोरेगाव येथील फिल्म सिटी येथे 10 एकरांच्या परिसरात या संस्थेच्या कायमस्वरूपी संकुलाची उभारणी सुरु आहे.शिष्यवृत्त्या आणि अभ्यासक्रम यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी कृपया iict.org येथे भेट द्यावी

 

* * *

पीआयबी मुंबई | हर्षल आकुडे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303544) अभ्यागत कक्ष : 4