गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोदी सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या आधी ‘आय एस आय’ समर्थित शहजाद भट्टी संघटित जाळे केले उद्ध्वस्त; संबंधित 200 जणांना अटक करुन घातपाती हल्ले करण्याचा त्यांचा बेत लावला उधळून


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, सीमापार दहशतवादाच्या विरोधात शून्य सहिष्णू धोरणाअंतर्गत कारवाईचा भाग म्हणून 14 राज्यातील 253 जणांना घेतले ताब्यात

शहजाद भट्टी नेटवर्कच्या विरोधात 80 हून अधिक एफआयआर आणि 200 हून अधिक गुन्ह्यांसंबंधी तक्रारींची नोंद

प्रविष्टि तिथि: 17 AUG 2026 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2026

 

स्वातंत्र्यदिनाच्या आधी सुरक्षा दलांनी आय एस आय समर्थित शहजाद भट्टी नेटवर्कच्या विरोधात विविध राज्यांमध्ये एक मोठी कारवाई करुन दहशतवादी जाळे उदध्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, सीमापार दहशतवादाच्या विरोधात शून्य सहिष्णू धोरणाअंतर्गत कारवाईचा भाग म्हणून 14 राज्यातील 253 जणांना ताब्यात घेतले आहे तर शहजाद भट्टी नेटवर्कच्या विरोधात 80 हून अधिक एफआरआय म्हणजेच प्राथमिक माहिती अहवाल, 200 हून अधिक गुन्‍ह्यांसंबंधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे: मोदी सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या आधी आय एस आय समर्थित दहशतवादी गट असलेले शहजाद भट्टी नेटवर्क उद्ध्वस्त केले आणि या संघटनेच्या 200 पेक्षा अधिक साथीदारांना अटक करून घातपाती हल्ले घडवून आणण्याचे त्यांचे डाव उधळून लावले. भारताच्या सुरक्षा दलांनी 14 राज्यांमध्ये समन्वित कारवाई करुन या नेटवर्कला उधळून लावले, हे दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या शून्य सहिष्णुता धोरणाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आयएसआय-समर्थित या गटाकडून आयईडी, पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीची खूण असलेले ग्रेनेड, पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि हेरगिरीसाठी वापरले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे यांसारखा मोठा साठा जप्त करण्यात आला. हे नेटवर्क अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते.

पाकिस्तान स्थित ‘आय एस आय’ समर्थित शहजाद भट्टी नेटवर्क हे दहशतवादी जाळे असून भारतात आय ई डी, पेट्रोल बॉम्ब हल्ले आणि लक्ष्यीत हल्ले करण्याचा त्यांचा डाव होता. याशिवाय शहजाद भट्टी नेटवर्क पोलीस, संरक्षण आणि धार्मिक स्थळांची टेहळणी करण्यासाठी, तसेच हेरगिरीच्या उद्देशाने  सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी स्थानिक मध्यस्थांना पैसेही देत आले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या सुमारास हल्ले घडवून आणण्याचे शहजाद भट्टी नेटवर्कने आखलेले डाव उधळून लावण्यासाठी प्रत्यक्ष स्थळांची गुप्तहेर माहिती सामायिक करण्यासाठी राज्य पोलिसांच्या सहकार्याने 12 ऑगस्ट रोजी एक बहुराज्यीय समन्वित मोहीम राबवण्यात आली. यात 14 राज्यांमधील  253 जणांना ताब्यात घेण्यात आले — उत्तर प्रदेश (62), हरियाणा (52), दिल्ली (51), पंजाब (44), राजस्थान (15), महाराष्ट्र (8), उत्तराखंड (5), कर्नाटक, गुजरात आणि बिहार (प्रत्येकी 3), आणि तेलंगणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि केरळ (प्रत्येकी 2) — तसेच दिल्ली आणि कर्नाटकमध्ये नवीन एफआयआर नोंदवण्यात आले.

एकत्रितपणे, शहजाद भट्टी नेटवर्कविरुद्ध यूएपीए, बीएनएस, शस्त्र कायदा, एनडीपीएस कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत  80 हून अधिक एफआयआर आणि 200 हून अधिक गुन्हे प्रकरणामध्‍ये अटकेची कारवाई नोंदवण्यात आली  आहे. जप्त केलेल्या सामग्रीमध्ये आयईडी, पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीची खूण असलेले ग्रेनेड, पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि हेरगिरीसाठी वापरलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांचा समावेश आहे — यावरुन या नेटवर्कचे संबंध  थेट सीमापार असल्याची  पुष्टी होते.

सुरक्षा यंत्रणांनी सीमापार दहशतवादाबाबत भारत सरकारची शून्य सहनशीलतेची भूमिका आणि देशभरातील शहजाद भट्टी नेटवर्कचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू असलेल्या समन्वित कारवाईचा पुनरुच्चार केला आहे.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/भक्‍ती सोनटक्के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2300568) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam