सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

11 वी ब्रिक्स सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक भोपाळमध्ये संपन्न; भोपाळ घोषणापत्राचा स्वीकार

प्रविष्टि तिथि: 08 AUG 2026 3:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2026

 

ब्रिक्स सदस्य देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांची 11 वी बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली भोपाळ येथे पार पडली. या बैठकीचा समारोप भोपाळ घोषणापत्राच्या स्वीकाराने झाला. ब्रिक्स सदस्य देश आणि भागीदार देशांमधील सांस्कृतिक सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी या घोषणापत्राद्वारे व्यावहारिक आणि भविष्योन्मुख आराखडा निश्चित करण्यात आला.

भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स सांस्कृतिक कार्यक्षेत्रातील कामकाज तीन सांस्कृतिक कार्य गटांच्या बैठकींमधून झाले. यापैकी पहिली बैठक 29–30 एप्रिल 2026 रोजी ऑनलाइन पद्धतीने, दुसरी बैठक 4–5 जून 2026 रोजी वाराणसी येथे, तर तिसरी बैठक 5–6 ऑगस्ट 2026 रोजी भोपाळ येथे झाली.

आज झालेल्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत भारतासह एकूण 14 देशांनी सहभाग घेतला. यामध्ये 10 ब्रिक्स  सदस्य देश आणि 4 भागीदार देशांचा समावेश होता. सहभागी ब्रिक्स  सदस्य देशांमध्ये ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश होता. यापैकी इजिप्तने या बैठकीत ऑनलाइन सहभाग घेतला.

भागीदार देशांमध्ये बेलारूस, क्युबा, कझाकस्तान आणि थायलंड यांचा समावेश होता. इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे सांस्कृतिक मंत्री देखील या बैठकीत सहभागी झाले. यामुळे ब्रिक्सच्या सांस्कृतिक क्षेत्रातील उच्चस्तरीय सहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले. या बैठकींमध्ये एकूण 55 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

“लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी” हे भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्सच्या  या बैठकीचे मुख्य सूत्र होते. सांस्कृतिक क्षेत्रातील संवादाचे व्यावहारिक उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यावर, तसेच संस्थात्मक सहकार्य अधिक बळकट करण्यावर यात विशेष भर देण्यात आला.

आज स्वीकारण्यात आलेल्या भोपाळ घोषणापत्राद्वारे सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेतील सहकार्याला चालना देण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये कार्यपद्धती, अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, सर्जनशीलतेला पाठबळ, नेटवर्किंग तसेच डिजिटल साधनांच्या माध्यमातून बाजारपेठेतील प्रवेशाच्या संधींचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला.

याशिवाय, UNESCO च्या बहुराष्ट्रीय नामांकनांबाबत, सांस्कृतिक वारशाचे स्रोत आणि त्याच्या मालकीबद्दल निश्चिती करण्यासाठीचे संशोधन, तसेच सांस्कृतिक संपत्तीच्या मूळ ठिकाणी परताव्याबाबत सहकार्य अधिक बळकट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित साधनांच्या वापराच्या शक्यतांचाही शोध घेतला जाणार आहे.

तसेच, पारंपरिक ज्ञानप्रणाली आणि सांस्कृतिक अभिव्यक्तींचे संरक्षण, पुरातन दस्तऐवज, त्यांचे डिजिटायझेशन आणि संवर्धन या क्षेत्रात संग्रहालये, ग्रंथालये आणि अभिलेखागारांमधील सहकार्य, तसेच निर्माणकर्त्यांच्या हक्कांचे संरक्षण यावर भर देण्यात आला.

याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींमध्ये कॉपीराइट संरक्षित कलाकृतींच्या वापराबाबत पारदर्शकता तसेच निर्माणकर्त्यांना योग्य आणि न्याय्य मोबदला मिळण्याची हमी देण्यावरही भर देण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्यक्षेत्रांतर्गत एक ठोस उपक्रम म्हणून भारताने ऐच्छिक कलाकार नोंदणी (Voluntary Artist Registry) विकसित करण्यासाठी पथदर्शी उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमामुळे ब्रिक्स  देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ करणे, व्यावसायिक नेटवर्क अधिक बळकट करणे आणि कलाकार तसेच सर्जनशील क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी अधिक संधी निर्माण करणे अपेक्षित आहे.

 

* * *

सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2296510) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Gujarati , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Kannada , Malayalam