पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये उंच उडी या क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल सर्वेश कुशारे याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
28 JUL 2026 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2026
ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये उंच उडी या क्रीडा प्रकारात पुरुषांसाठीच्या सामन्यात रौप्य पदक पटकावल्याबद्दल सर्वेश कुशारे याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. सर्वेश कुशारे याचा निग्रह आणि सातत्य या गोष्टींची प्रशंसा करत त्याची ही कामगिरी अद्वितीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे
भारताला त्याचा अभिमान आहे असे नमूद करत मोदी यांनी त्याला भावी आयुष्यातील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“#CWG2026 मध्ये उंच उडी या प्रकारात पुरुषांसाठीच्या सामन्यात रौप्य पदक जिंकून सर्वेश कुशारेने उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्याचा निग्रह आणि सातत्य नमूद करण्याजोगे आहे. त्याच्या झळाळत्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन. भारताला त्याचा अभिमान आहे. पुढील आयुष्यातील अधिकाधिक यशासाठी त्याला शुभेच्छा”
* * *
निलिमा चितळे/विजया सहजराव/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2290603)
अभ्यागत कक्ष : 37
Read this releasein:
Telugu
,
Kannada
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam