महिला आणि बालविकास मंत्रालय
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने आमंत्रित
नामांकनांसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026
Posted On:
02 JUL 2026 4:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जुलै 2026
महिला आणि बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) 2026 साठी नामांकने पाठवण्यासाठी पुन्हा एकदा आवाहन केले आहे. नामांकनांसाठी 31 जुलै 2026 ही अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी सर्व नामांकने केवळ https://awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलद्वारेच पाठवली गेली पाहिजेत.
क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि असाधारण यश मिळवणाऱ्या 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या कौतुकासाठी हा एक अनोखा सन्मान आहे. अत्यंत कठीण प्रसंगात असामान्य धाडस दाखवणाऱ्यांनाही हा पुरस्कार दिला जातो.
कोणताही नागरिक, शाळा, संस्था किंवा संघटना त्यांना पात्र वाटणाऱ्या उमेदवारांचे नामांकन करू शकतात. या वयोगटातील मुले स्वतः देखील यासाठी स्वयं-नामांकन (Self-nomination) अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रियेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
अर्जदारांना आपली मूलभूत वैयक्तिक माहिती आणि पुरस्काराची श्रेणी भरावी लागेल आणि त्यानंतर एक अलीकडील छायाचित्र आणि सहाय्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि त्याच्या प्रभावाबद्दल लेखी माहिती (जास्तीत जास्त 1000 शब्दांपर्यंत) सादर करावी लागेल.
मंत्रालय शाळा, युवा गट, स्वयंसेवी संस्था, पंचायती आणि व्यक्तींना या अंतिम महिन्याचा वापर करून संभाव्य उमेदवारांचा शोध घेण्यास आणि त्यांना पाठबळ देण्यास प्रोत्साहित करत आहे. चला, आपण सर्वांनी मिळून भारताच्या सर्वात तरुण मार्गदर्शकांना योग्य तो सन्मान मिळावा, हे सुनिश्चित करूया.
* * *
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2280356)
अभ्यागत कक्ष : 58
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam