पंतप्रधान कार्यालय
भारत-युके व्यापक आर्थिक आणि व्यापार करार द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
17 JUN 2026 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2026
भारत-युके व्यापक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलै 2026 पासून अंमलात येणार असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या करारामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये लक्षणीय वाढ होईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगारवर्ग, एमएसएमई उद्योग, स्टार्ट अप्स आणि नवोन्मेषकर्त्यांसाठी असंख्य संधी खुल्या होतील आणि त्यातून विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करण्यात अर्थपूर्ण योगदान मिळेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी आणि युकेचे पंतप्रधान केर स्टार्मर सध्या जी7 शिखर परिषदेसाठी एवियन येथे उपस्थित आहेत आणि ते दोघेही भारत-युके आर्थिक संबंधांना लाभलेल्या या लक्षणीय गतीबद्दल अत्यंत आनंदित झाले आहेत, असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधान, एक्स मंचावरील संदेशात लिहितात;
“भारत-युके संबंधांसाठी एक ऐतिहासिक टप्पा.
भारत-युके व्यापक आर्थिक आणि व्यापार करार दिनांक 15 जुलै 2026 रोजी अंमलात येत आहे हे नमूद करण्यास आनंद होत आहे.
हा करार आपल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना देईल.
हा करार भारतीय शेतकरी, कामगारवर्ग, एमएसएमई उद्योग, स्टार्ट अप्स आणि नवोन्मेषकर्त्यांसाठी असंख्य संधी खुल्या करून देईल आणि विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करण्यात देखील अर्थपूर्ण योगदान देईल.
जी7 शिखर परिषदेसाठी एवियन येथे उपस्थित असलेले पंतप्रधान स्टार्मर आणि मी, आपल्या आर्थिक संबंधांना मिळत असलेल्या लक्षणीय गतीमुळे साहजिकच अत्यंत आनंदित झालो आहोत.
@Keir_Starmer”
सोनाली काकडे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2274568)
अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam