पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत इनोव्हेट्स' कार्यक्रमातील आपल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे केले सामायिक

प्रविष्टि तिथि: 14 JUN 2026 8:05PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील 'भारत इनोव्हेट्स' कार्यक्रमातील आपल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे सामायिक केले आहेत.

अनेक संदेशांच्या मालिकेत मोदी म्हणाले;

“भारतात या.

आमच्यासोबत काम करा.

भारतात डिझाइन करा.

भारतात विकास साधा.

आणि जगासाठी उपाययोजना तयार करा.

@BharatInnov2026”

“नवोन्मेष हा भारताच्या डीएनएमध्ये आहे.

भारतातील तरुण सर्वच क्षेत्रांमध्ये नवनवीन शोध लावत आहेत. ते गंभीर जागतिक आव्हानांवरही उपाय शोधत आहेत.

@BharatInnov2026”

“आज, जग अशा तंत्रज्ञानाकडे पाहत आहे जे विश्वासार्ह, सर्वसमावेशक, मानवकेंद्रित आणि जागतिक हितासाठी समर्पित आहे.

अशा वेळी, भारताचे प्राधान्य स्पष्ट आहे… मानवतेसाठी तंत्रज्ञान आणि मानवकेंद्रित नवोन्मेष.

@BharatInnov2026”

भारत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने नवनवीन शोध लावत आहे.

भारत एका शाश्वत भविष्यासाठी नवनवीन शोध लावत आहे.

आणि भारत संपूर्ण जगासाठी नवनवीन शोध लावत आहे.

@BharatInnov2026”

 

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2272803) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Malayalam