माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते जैसलमेर मध्ये रामगड येथील 20 किलोवॅटच्या आकाशवाणी एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन


रेडिओ प्रसारणाने समर्पक आणि प्रभावी राहण्यासाठी “डिजिटल फर्स्ट” आणि “हायपर-लोकल” दृष्टीकोन स्वीकारायला हवा: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

प्रविष्टि तिथि: 11 JUN 2026 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2026

 

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज आकाशवाणी जयपूर परिसरातून आभासी पद्धतीने जैसलमेर मध्ये रामगड परिसरात उभारलेल्या 20 किलोवॅट क्षमतेच्या आकाशवाणी एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन केले.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी प्रसारभारतीची कार्यपद्धती आणि दृष्टीकोन यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले. अतिजलद तांत्रिक प्रगतीच्या या युगात समर्पक आणि प्रभावी राहण्यासाठी “डिजिटल फर्स्ट” आणि “हायपर-लोकल” दृष्टीकोन स्वीकारायला हवा यावर त्यांनी अधिक भर दिला.या परिवर्तनासाठी आवश्यक आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देत केंद्रीय मंत्र्यांनी प्रसारण परिसंस्थेमध्ये स्थानिक कलाकार आणि कारागिरांना सामावून घेण्याचे महत्त्व ठळकपणे विषद केले.

  

जयपूर येथे लवकरच उभ्या राहणाऱ्या कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) डाटा केंद्राचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि ते म्हणाले की हे केंद्र म्हणजे भविश्यासाठीचा पाया आणि तंत्रज्ञानातील प्रगतीच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.  

प्रसारभारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले आणि आकाशवाणी तसेच दूरदर्शन यांसारख्या संस्थांचे चिरस्थायी महत्त्व अधोरेखित केले.ते म्हणाले की या संस्था समाजाच्या मुळांशी खोलवर जोडलेल्या आहेत आणि त्या अधिक विस्तृत श्रोत्यांसाठी माहितीचे प्रसारण करण्यात तसेच मुलभूत वास्तवाचे दर्शन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन यांची पोहोच आणखी बळकट करणे हे या नव्या ट्रान्समीटरच्या उभारणीचे उद्दिष्ट आहे. अधिक विस्तृत संपर्क विषयक पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरत हा ट्रान्समीटर केवळ जैसलमेरच नव्हे तर आसपासच्या भागांसाठी देखील उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले. संपूर्ण सीमाभागात प्रसारण सेवांचा पद्धतशीर विस्तार सुनिश्चित करत हा उपक्रम “काश्मीर ते कच्छ” असा समर्पित प्रसारणविषयक पायाभूत सुविधांच्या संकल्पनेशी जुळणारा आहे.

या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी प्रसार भारतीमध्ये कार्यरत तरुण अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला.

 

* * *

निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2271820) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam