गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे सर्वाधिक काळ निर्वाचित पंतप्रधान म्हणून जनतेची सेवा करण्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या
Posted On:
10 JUN 2026 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2026
देशाचे सर्वाधिक काळ निर्वाचित पंतप्रधान म्हणून जनतेची सेवा करण्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी हार्दिक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स वरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले, “देशाच्या जनतेची सेवा करणारे सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान बनण्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. मोदीजींच्या या 12 वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या आत्मसन्मानाचे पुनरुत्थान, सांस्कृतिक पुनर्जागरण आणि वसाहतवादी मानसिकतेतून राष्ट्राची मुक्ती झाली. नवीन संसद भवन बांधण्यात आले, तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले, नवीन शिक्षण धोरण सादर करण्यात आले आणि मातृभाषेतून वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.” त्याच वेळी, 'आत्मनिर्भर भारत' हा प्रत्येक भारतीयाचा संकल्प बनला. या 12 वर्षांत देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या, काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आले, राम मंदिराचे बांधकाम झाले, नक्षलवादाविरुद्ध निर्णायक यश मिळवले गेले आणि प्रत्येक दहशतवादी घटनेला चोख प्रत्युत्तर देऊन दहशतवादाचा खंबीरपणे सामना करण्यात आला. त्याचबरोबर, देशाची सामूहिक शक्ती न्यूनगंडाच्या भावनेतून बाहेर पडली आणि आपला वारसा, संस्कृती व क्षमता यांचा अभिमान बाळगायला शिकली. देशातील लोकांना सुरक्षित करणे आणि त्यांचा गमावलेला आत्मसन्मान व प्रतिष्ठा परत मिळवून देणे, हे मोदीजींचे सर्वात मोठे यश आहे. आज एक नवा भारत प्रत्येक जागतिक व्यासपीठावर आपली ओळख आत्मविश्वासाने प्रस्थापित करत आहे आणि जग एका सक्षम, बलवान आणि परिवर्तित भारताचा उदय पाहत आहे.”
दुसऱ्या एका पोस्टमध्ये गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “मोदीजींचे नेतृत्व हे संकल्पापासून यशापर्यंत आणि सेवेपासून सुशासनापर्यंतच्या प्रवासाचे प्रतीक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आत्मविश्वास, विकास आणि जागतिक प्रतिष्ठा यांचे नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत.”
* * *
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2271412)
अभ्यागत कक्ष : 44
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam