पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
तेलाची आयात कमी करण्यापासून ते शेतकऱ्यांच्या समृद्धीपर्यंत: हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते पहिल्या फ्लेक्स-फ्युएल प्रवासी वाहनाचे अनावरण
Posted On:
04 JUN 2026 5:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2026
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज नवी दिल्लीत मारुती सुझुकीच्या भारतातील पहिल्या फ्लेक्स-फ्युएल प्रवासी वाहनाचे अनावरण केले, त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ मिळाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. फ्लेक्स-फ्युएल वाहने E 20 ते E 100 पर्यंतच्या इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालू शकतात.
प्रवासी वाहन क्षेत्रात फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानाचा प्रवेश हे केवळ एका उत्पादनाचे सादरीकरण नसून, भारताच्या ऊर्जा संक्रमणातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे, असे पुरी यांनी यावेळी सांगितले. भारतात सुमारे 37 लाख प्रवासी वाहने आहेत, ही वाहने भारतीय मध्यमवर्गाच्या आकांक्षा आणि वैयक्तिक गतिशीलतेच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करतात, असे पुरी यांनी नमूद केले. या क्षेत्रात फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केल्यामुळे इथेनॉल-आधारित गतिशीलतेचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले.

28 फेब्रुवारी रोजी लष्करी संघर्ष सुरू होण्यापूर्वी भारताची सुमारे 60% एलपीजी आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होत होती, असे पुरी यावेळी म्हणाले. 1.4 अब्ज लोकसंख्या आणि जागतिक सरासरीच्या तीन पट अधिक ऊर्जा मागणीची वाढ असलेला देश म्हणून, भारताने देशभरात पेट्रोलियम उत्पादनांची अखंड उपलब्धता सुनिश्चित केली, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, काही ठिकाणी चुकीची माहिती पसरवण्याचे आणि कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले असले तरी, वेळेवर केलेले धोरणात्मक हस्तक्षेप आणि प्रभावी व्यवस्थापनामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली.

भारताच्या स्वच्छ गतिशीलता संक्रमणातल्या योगदानाबद्दल मारुती सुझुकीचे अभिनंदन करताना,पुरी म्हणाले की, भारताचे ऊर्जा संक्रमण भारतातच घडेल, त्याला भारतीय नवकल्पनांचे पाठबळ, भारतीय शेतकऱ्यांचा आधार आणि भारतीय ग्राहकांची गती असेल. त्यांनी वाहन उत्पादकांना सर्व वाहन श्रेणींमध्ये फ्लेक्स फ्युएल मॉडेल्स सादर करायला गती देण्याचे आणि तेल विपणन कंपन्यांना देशभरात E 85 ची उपलब्धता वेगाने वाढवण्याचे आवाहन केले.
* * *
सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2268945)
अभ्यागत कक्ष : 70
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam