पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
अपघातग्रस्तांना सानुग्रह मदतीची पंतप्रधानांची घोषणा
Posted On:
16 APR 2026 9:50AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांप्रति पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. तर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की;
आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात झालेला अपघात अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो तसेच जखमींना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना करतो.
पीएमएनआरएफमधूनन प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील: PM @narendramodi”
***
Nehakulkarni / ManjiriGanoo / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2252450)
अभ्यागत कक्ष : 28
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam