पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पुथांडूचे महत्त्व आणि भारताची सांस्कृतिक मूल्ये यावरील लेख केला सामायिक
Posted On:
14 APR 2026 1:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.
हा लेख भारताच्या वैविध्यपूर्ण सणांमधील समृद्धी अधोरेखित करतो आणि पुथांडूनिमित्त जनतेला शुभेच्छा देतो; तसेच परंपरा, कुटुंब, आध्यात्मिकता आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांना एकत्र आणणारा सण म्हणून पुथांडूचे महत्त्व विशद करतो. युवा पिढी 'एक भारत' या आदर्शांवर वाटचाल करेल आणि 2047 पर्यंत श्रेष्ठ भारत व विकसित भारत घडवण्यात आपले योगदान देईल, अशी आशा या लेखात व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले आहे :
भारताच्या वैविध्यपूर्ण सणांची समृद्धी अधोरेखित करताना @VPIndia, थिरु @CPR_VP जी यांनी पुथांडूनिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, परंपरा, कुटुंब, आध्यात्मिकता आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांना एकत्र आणणारा सण म्हणून त्यांनी या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
युवा पिढी 'एक भारत' या आदर्शांवर वाटचाल करत, 2047 पर्यंत श्रेष्ठ भारत आणि विकसित भारत घडवण्यात आपले योगदान देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
https://www.hindustantimes.com/opinion/indias-many-new-years-reflect-ancient-knowledge-101776093540420.html”
* * *
सुषमा काणे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251825)
अभ्यागत कक्ष : 13