पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक केला व्यक्त

Posted On: 13 APR 2026 1:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 एप्रिल 2026

 

पंतप्रधानांनी गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपले नातेवाईक आणि प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती पंतप्रधानांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. तसेच, या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या एका संदेशात म्हटले आहे की,

गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायक आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो.

 

* * *

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251479) अभ्यागत कक्ष : 14