पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी गुजरातमधील पोरबंदर येथील माधवपूर मेळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या

Posted On: 29 MAR 2026 10:23AM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पोरबंदर येथे सुरू असलेल्या माधवपूर मेळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. हा चैतन्यमय उत्सव आपल्या गौरवशाली संस्कृतीवर प्रकाश टाकतो आणि त्याचवेळी गुजरात आणि ईशान्य भारताच्या कालातीत सांस्कृतिक बंधाला अधिक दृढ करतो, असे मोदी म्हणाले. हा उत्सव विविध परंपरांना एकत्र आणतो, जो 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या खऱ्या भावनेचे दर्शन घडवतो.  या मेळ्याला आवर्जून भेट देण्याचे मी जनतेला आवाहन करतो, असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी एप्रिल 2022 मधील 'मन की बात' कार्यक्रमात माधवपूर मेळ्याचे महत्त्व आणि आपल्या संस्कृतीतील त्याचे स्थान यावर भाष्य केले होते.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे की,

गुजरातमधील पोरबंदर येथे होत असलेल्या माधवपूर मेळ्यानिमित्त माझ्याकडून खूप शुभेच्छा. हा चैतन्यमय सोहळा आपल्या गौरवशाली संस्कृतीवर प्रकाश टाकतो आणि त्याच बरोबर गुजरात आणि ईशान्य भारतामधील कालातीत सांस्कृतिक बंधांना बळकटी देतो. हा उत्सव विविध परंपरांना एकत्र गुंफणारा असून 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या खऱ्या भावनेचे दर्शन घडवतो. मी नागरिकांना या मेळ्याला आवर्जून भेट देण्याचे आवाहन करतो.  

“एप्रिल 2022 च्या #MannKiBaat कार्यक्रमात मी माधवपूर मेळ्याचे महत्त्व आणि आपल्या संस्कृतीतील त्याचे स्थान याबद्दल बोललो होतो. जरूर ऐका…”

***

नेहा कुलकर्णी / राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246626) अभ्यागत कक्ष : 17