पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एलपीजी सिलेंडर बुकींगच्या कालमर्यादेसंबंधीत वृत्ताबाबत स्पष्टीकरण

Posted On: 25 MAR 2026 11:30AM by PIB Mumbai

सरकारच्या असे निदर्शनाला आले आहे की काही बातम्यांमध्ये तसेच समाज माध्यमांवरील पोस्टस मध्ये एलपीजी सिलेंडर बुकींगची कालमर्यादा बदलण्यात आली असून – पीएमयुवाय जोडण्यांसाठी 45 दिवस तर बिगर-पीएमयुवाय एकल सिलेंडर जोडण्यांसाठी 25 दिवस तर बिगर-पीएमयुवाय दुहेरी सिलेंडर्स जोडण्यांसाठी 35 दिवसांचा कालावधी लागेल असे दावे करण्यात आले आहेत.

 याबाबत स्पष्ट करण्यात येते की असे कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. सध्याची रिफिल बुकिंग कालमर्यादा पूर्ववत असून ती पुढीलप्रमाणे आहे:  

  • शहरी भागांमध्ये 25 दिवस, आणि
  • ग्रामीण भागांमध्ये 45 दिवस, जोडणीचा प्रकार विचारात न घेता ही कालमर्यादा निश्चित आहे.

नागरिकांनी अशा कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच अशी माहिती प्रसारित करू नये आणि एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी अनावश्यक किंवा घाबरून जाऊन बुकिंग करणे टाळावे अशा सूचना सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत.

देशात एलपीजी सिलेंडर्सचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही याचा सरकारने पुनरुच्चार केला आहे.

***

NehaKulkarni / SanjanaChitnis / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2244885) अभ्यागत कक्ष : 71