पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 23 MAR 2026 8:29AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शहीद दिनानिमित्त महान स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

राष्ट्रासाठी या महान नायकांचे बलिदान भारताच्या सामूहिक स्मृतीमध्ये आजही खोलवर कोरलेले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.  अगदी तरुण वयातच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ध्येयाप्रती आपली अढळ वचनबद्धता सिद्ध केली होती.  वसाहतवादी सत्तेच्या ताकदीसमोर न डगमगता या वीरांनी दृढ निश्चयाने बलिदानाचा मार्ग निवडला आणि राष्ट्राला आपल्या प्राणांपेक्षा श्रेष्ठ मानले.  न्याय, देशभक्ती आणि निर्भीड प्रतिकार यांसारखे त्यांचे आदर्श आजही असंख्य भारतीयांच्या मनात स्फुल्लिंग चेतवत आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर म्हटले आहे : 

 ''भारतमातेचे शूर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आज आपण श्रद्धापूर्वक नमन करतो. राष्ट्रासाठी त्यांनी दिलेले बलिदान आपल्या सामूहिक स्मृतीमध्ये कायमचे कोरलेले आहे.   

अगदी तरुण वयातच त्यांनी विलक्षण साहस आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या ध्येयाप्रती आपली अढळ वचनबद्धता सिद्ध केली होती.  वसाहतवादी सत्तेच्या ताकदीसमोर न डगमगता या वीरांनी दृढ निश्चयाने बलिदानाचा मार्ग निवडला आणि राष्ट्राला आपल्या प्राणांपेक्षा श्रेष्ठ मानले.  न्याय, देशभक्ती आणि निर्भीड प्रतिकार यांसारखे त्यांचे आदर्श आजही असंख्य भारतीयांच्या मनात स्फुल्लिंग चेतवत आहेत.''

***

NehaKulkarni / SonaliKakde / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2243730) अभ्यागत कक्ष : 21