पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताची सशक्त उर्जा परिसंस्था आणि शाश्वत भविष्यावर आधारित लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 18 MAR 2026 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मार्च 2026

भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भात केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी लिहिलेला विशेष लेख आज पंतप्रधानांनी अधोरेखित केला.

केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी या लेखातून भारत कशा प्रकारे सशक्त ऊर्जा परिसंस्थेला सामर्थ्य देत आहे आणि भविष्यातील गरजांसाठी शाश्वत वातावरण देखील घडवत आहे याचे दर्शन घडवले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. विकसित भारताचे वचन देणारी भारताची ऊर्जाविषयक धोरणे कशी आहेत याची नेमकी कल्पना येण्यासाठी प्रत्येकाने हा लेख वाचावा म्हणून पंतप्रधानांनी वाचकांना प्रोत्साहित केले.

‘एक्स’वर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“भारत कशा प्रकारे सशक्त ऊर्जा परिसंस्थेला सामर्थ्य देत आहे आणि भविष्यातील गरजांसाठी शाश्वत वातावरण देखील घडवत आहे याचे दर्शन केंद्रीय मंत्री @mlkhattar यांनी या लेखातून घडवले आहे.

विकसित भारताचे वचन देणारी भारताची ऊर्जाविषयक धोरणे कशी आहेत याची नेमकी कल्पना येण्यासाठी हा लेख नक्की वाचा.”

नितीन फुल्लुके /संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2241693) अभ्यागत कक्ष : 15