आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
मध्य प्रदेशातील दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या बदनावर-पेटलावाड-थांडला-तिमरवानी भागाच्या (एनएच-752डी) 3,839.42 कोटी रुपये किमतीच्या, हायब्रिड ॲन्युइटी पद्धतींच्या चार पदरी रस्ते बांधकामाला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
Posted On:
10 MAR 2026 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने आज राष्ट्रीय महामार्ग-752डी च्या बदनावर-पेटलावाड-थांडला-तिमरवानी भागाच्या 80.45 किलोमीटर लांबीच्या एकूण 3,839.42 कोटी रुपये खर्चाच्या 4-पदरी कॉरिडॉर विकासाला मान्यता दिली आहे.
मंजूर करण्यात आलेल्या या मार्गिकेमुळे उज्जैनला तिमरवानी इंटरचेंज मार्गे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेशी थेट जोडता येणे शक्य होणार आहे.
प्रस्तावित चार पदरी मार्गिकेचा प्राथमिक उद्देश, प्रवासी कार्यक्षमता वाढवणे असून त्यामुळे प्रवासाचा कालावधी सुमारे एक तासाने कमी होईल अशी अपेक्षा आहे. 70.40 किमी लांबीचा उज्जैन-बदनावर विभाग आधीच 2-पदरीवरुन 4-पदरी मार्गात रूपांतरित करण्यात आला आहे. सध्या बदनावर-तिमरावनी हा भाग 5.5 मीटर रुंदीचा मध्यम मार्ग असला, तरी, तो निम्न दर्जाचा असल्यामुळे वाहनांचा वेग ताशी 20 ते 50 किलोमीटर इतकाच राहतो. रस्त्याचा हा पट्टा चार पदरी केल्यानंतर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वर उज्जैन ते तिमरावनी इंटरचेंजपर्यंत वाहने ताशी 80-100 किमी वेगाने जाऊ शकतील.
तिमरवानी-थांडला-पेटलावाड-बदनावर-उज्जैन कॉरिडॉर, हा गुजरात आणि महाराष्ट्रातून उज्जैनकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी सर्वात कमी अंतराचा मार्ग आहे. तिमरवानी-बदनावर विभागाचे उन्नतीकरण केल्याने आंतरराज्यीय संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होईल, तसेच एप्रिल-2028 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान वाढणारी वाहतूक हाताळणे सुलभ होईल.
बदनावर-पेटलावाड थंडला-तिमरवानी हा मार्ग धार आणि झाबुआ या आदिवासी जिल्ह्यांमधून जातो. धार जिल्ह्याचा काही भाग नीती आयोगाच्या आकांक्षी तालुके कार्यक्रमांतर्गत येतो. या विभागाच्या उन्नतीकरणामुळे उज्जैन-बदनावर-तिमरवानी कॉरिडॉर मार्गे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गापर्यंत थेट आणि जलद प्रवेश मिळेल. या सुधारित जोडणीमुळे लॉजिस्टिक्स खर्च कमी होतील, कच्च्या मालाची आणि तयार वस्तूंची वाहतूक सुलभ होईल तसेच इंदूर, पिथमपूर, उज्जैन आणि देवास येथे असलेली औद्योगिक केंद्रे तसेच बहुवाहतूक पद्धतीच्या लॉजिस्टिक पार्कपर्यंत पोहोचणे सोपे होईल.
प्रस्तावित रस्ते प्रकल्प जलद गतीने, सुरक्षित रस्ते संपर्कासाठी आरेखित करण्यात आला असून यामुळे - प्रवासाचा वेळ कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, वाहन चालवण्याचा खर्च कमी होईल, वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होईल. महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकल्प मध्य प्रदेशाच्या मूलभूत पायाभूत सुविधा वाढवेल. परिणामी मध्य प्रदेशातील धार आणि झाबुआ जिल्ह्यांच्या एकूण आर्थिक विकासाला हातभार लागेल.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
|
Sr. No.
|
Project Features
|
Details
|
|
1
|
Length
|
80.45 kms (Greenfield + Brownfield) Corridor
|
|
2
|
Type of pavement
|
Flexible Pavement
|
|
3
|
Proposed Configuration
|
4-Lane
|
|
4
|
Major Bridges
|
06
|
|
5
|
Minor Bridges
|
34 Nos.
|
|
6
|
RUB (Road Under Bridge)
|
01 Nos.
|
|
7
|
VUP / LVUP/SVUP
|
9 Nos. / 29 Nos. / 04 Nos.
|
|
8
|
Construction period
|
24 months
|
|
9
|
Concession Period
|
17 Years (2 Yrs Construction period + 15 Yrs O&M)
|

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2237743)
अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein:
Gujarati
,
Bengali
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Odia
,
Kannada
,
Malayalam