पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी परमपूज्य मोरन मोर इग्नाटियस अफ्रेम II यांची भेट घेतली
Posted On:
27 FEB 2026 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, अँटिऑक आणि ऑल द ईस्टचे पॅट्रिआर्क तसेच युनिव्हर्सल सिरियाक ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च प्रमुख परमपूज्य मोरन मोर इग्नाटियस अफ्रेम II यांची भेट घेऊन सन्मानित झाल्याची भावना व्यक्त केली.
या भेटीदरम्यान उभयतांमध्ये विविध विषयांवर सविस्तर आणि अर्थपूर्ण चर्चा झाली.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले:
“अँटिऑक आणि ऑल द ईस्टचे पॅट्रिआर्क तसेच युनिव्हर्सल सिरियाक ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च प्रमुख परमपूज्य मोरन मोर इग्नाटियस अफ्रेम द्वितीय यांची भेट घेण्याचा मला सन्मान लाभला.
विविध विषयांवर आमची उत्कृष्ट चर्चा झाली.”
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2233793)
अभ्यागत कक्ष : 52
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam