पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 च्या उद्घाटन कार्यक्रमाची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक

Posted On: 19 FEB 2026 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एआय इम्पॅक्ट शिखर परिषद  2026 च्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या आपल्या भाषणाची क्षणचित्रे  सामायिक केली आहे.

 पंतप्रधानांनी  एक्सवरील विविध पोस्ट्स द्वारे म्हटले आहे :

“कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या परिवर्तनांपैकी एक आहे!” ”

“ भारताचा एआयसाठीचा दृष्टिकोन  ' MANAV ' (मानव) या शब्दाच्या आद्याक्षरांत गुंतलेले आहे, ज्याचा अर्थ 'मानवतेसाठी’असा होतो.”

“कृत्रिम बुद्धिमत्ता मानवजातीच्या क्षमतांना एका नवीन उंचीवर घेऊन जाईल.”

“चला आपण एआयला जागतिक सामाईक हितासाठी विकसित करण्याचा संकल्प करूया”  ”

 “दुर्दैवाने, एआय डीपफेक आणि बनावट आशय  खुल्या समाजांना अस्थिर करत आहेत.

वॉटरमार्किंग आणि स्पष्ट स्रोत मानकांची वाढत्या प्रमाणात आवश्यकता आहे.

आपण मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक जागरूक असले पाहिजे.

"भारतात संरचना आणि विकास करा

जगात सगळीकडे  पोहोचवा

मानवतेच्या कल्याणासाठी उपयोग करा"

 “दिल्लीतील एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेने  एआय जगतातील मान्यवरांना एकत्र आणले आहे.

100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित.

जगाच्या कानाकोपऱ्यातील मान्यवरांचा सहभाग. 

आमचे ध्येय एकच आहे- "आपल्या पृथ्वीच्या  कल्याणासाठी एआयच्या शक्तीचा वापर"

"नवी दिल्लीत आयोजित जगातल्या सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत!" 


सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 
 

 


(Release ID: 2230317) अभ्यागत कक्ष : 13