पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली सर्बियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
Posted On:
18 FEB 2026 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या निमित्ताने सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.
पंतप्रधानांनी एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल राष्ट्रपती वुसिक यांचे आभार मानले. 2017 मध्ये व्हायब्रंट गुजरात ग्लोबल शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती वुसिक यांच्या भारत भेटीची आणि नोव्हेंबर 2023 मध्ये दूरदृश्य प्रणालीमार्फत झालेल्या दुसऱ्या व्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ शिखर परिषदेत त्यांच्या सहभागाची आठवणही पंतप्रधानांनी काढली.
दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिन-टेक, शिक्षण, शेती आणि नागरिकांमधील देवाणघेवाणीमध्ये द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही मते मांडली. तसेच संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय मंचांवर एकमेकांना दिलेल्या पाठिंब्याची प्रशंसा केली.
* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2230000)
अभ्यागत कक्ष : 7