पंतप्रधान कार्यालय
एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी भारताची जागतिक एआय क्रांतीमधील भूमिका केली अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
18 FEB 2026 10:48AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
भारताकडे यजमानपद असलेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे बदल घडवून आणण्याची क्षमता आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील जागतिक क्रांतीला दिशा देण्यामधील भारताची महत्त्वाची भूमिका याविषयीचे आपले विचार व्यक्त केले.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात नवोन्मेष, बुद्धीमत्ता आणि नैतिक नेतृत्व यांचे केंद्र म्हणून भारताचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान अधोरेखित केले.
एक्स माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे,
“भारताच्या यजमानपदात दिल्लीत एआय इम्पॅक्ट शिखर परिषद होत असताना, कृत्रिम बुद्धिमत्तेचे बदल घडवून आणण्याची क्षमता, भारताची कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीमधील भूमिका या आणि अन्य विषयांवर एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माझे विचार मांडले.”
* * *
नेहा कुलकर्णी/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2229443)
आगंतुक पटल : 75
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada