गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत दिल्ली पोलिस स्थापनादिन कार्यक्रमा ला मुख्य अतिथी म्हणून केले संबोधित
तीन नवीन न्याय संहितांच्या पूर्ण अंमलबजावणीनंतर देशभराचा दोषसिद्धी दर लक्षणीय वाढणार
प्रविष्टि तिथि:
16 FEB 2026 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2026
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत दिल्ली पोलिसच्या 79 व्या स्थापनदिन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून संबोधित केले.
दिल्ली ही देशाची राजधानी असण्याबरोबरच, देशाच्या लोकशाहीच्या हृदयाचा ठोका आणि तिची ओळख आहे. राष्ट्रीय राजधानी असल्याने, दिल्लीची सुरक्षाव्यवस्था जागतिक मापदंडांनुसार सर्वोत्कृष्टच असली पाहिजे, यावर शाह यांनी भर दिला.

दिल्लीत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने, तसेच राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची निवासस्थाने आणि कार्यालयेही दिल्लीत असल्याने, दिल्ली पोलिसांवरील दायित्व लक्षणीय वाढते. सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली पोलीस नेहमीच आघाडीवर राहिले आहेत आणि आपली कर्तव्ये त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सफलतापूर्वक पार पाडली आहेत, असेही शाह म्हणाले.
दिल्ली पोलिसांच्या 10 नवीन प्रकल्पांची आज पायाभरणी झाली, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.
नवीन न्याय संहितेच्या पूर्ण अंमलबजावणीनंतर आपली न्यायप्रणाली जगात सर्वात आधुनिक होईल, असे अमित शाह म्हणाले. नवीन कायद्यांमुळे न्यायप्रणालीतील विलंब कमी होतील आणि गुन्हे सिद्ध होण्याचा दर वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आसाम, हरियाणा आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचा दर लक्षणीय वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात 2014 ते 2026 या 12 वर्षांचा काळ देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या इतिहासात सुवर्णकाळ म्हणून नोंदला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.
11 राज्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद कायमच देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोर आव्हान ठरत आला होता. त्याचा संपूर्ण नायनाट करण्याच्या अगदी जवळ आपण पोहोचलो आहोत, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देशाला नक्षली हिंसाचारापासून मुक्त करण्यात आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

* * *
निलिमा चितळे/जाई वैशंपायन/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2228922)
आगंतुक पटल : 75
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam