आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग-160 ए च्या घोटी – त्रिंबक (मोखाडा) – जव्हार – मानोर – पालघर विभागाच्या चौपदरीकरण आणि पुनर्वसन सुधारणेस मंत्रिमंडळाची मंजुरी; एकूण लांबी 154.635 किमी, भांडवली खर्च. 3320.38 कोटी रुपये येणार
Posted On:
14 FEB 2026 1:05PM by PIB Mumbai
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक कार्य समितीने काल महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग -160 ए च्या घोटी–त्र्यंबक (मोखाडा)–जव्हार- मनोर- पालघर विभागाच्या 154.635 किमी लांबीच्या पुनर्वसन व सुधारणेला मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण भांडवली खर्च 3,320.38 कोटी लागणार आहे.
नाशिकच्या पश्चिम भागात, विशेषतः अंबाड आणि सतपूर परिसरात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे विकसित केलेल्या औद्योगिक युनिट्स मोठ्या प्रमाणात असून , त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होते. सध्या ही वाहतूक नाशिक शहरातून एनएच-848 मार्गे जात असल्यामुळे शहरी रस्त्यांवर ताण येत आहे. विद्यमान मुख्य मार्ग आधीच सामान्य वाहतूक परिस्थितीच्या मर्यादा पातळीवर कार्यरत आहे.
मुंबईकडून एनएच-848 (6 पदरी ): 50,000–60,000 प्रवासी वाहन प्रति दिन (एल.ओ.एस.-सी : 55,000)
पुण्याकडून एनएच-60 (4 पदरी ): 40,000–50,000 प्रवासी वाहन प्रति दिन (एल.ओ.एस.-सी: 36,000)
एन एच -160 ए चा सुधारित मार्ग त्र्यंबक मार्गे औद्योगिक क्षेत्रांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देईल, ज्यामुळे शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचा ओघ कमी होईल. मुंबईच्या (पश्चिमेकडील) आणि दक्षिणेकडील बाजूच्या वाहतुकीला एनएच -848 वरील इगतपुरी इंटरचेंजद्वारे समृद्धि महामार्ग वापरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर, वाहतुकीला एनएच-848 वरून घोटीपर्यंत प्रवास करावा लागेल आणि नंतर त्र्यंबक व नाशिककडे जाण्यासाठी एन एच -160 ए वापरावा लागेल. 2028 पासून, दररोजची अपेक्षित वाहतूक 10,000 प्रवाशी वाहतूक प्रति दिन पेक्षा जास्त होईल, ज्यामुळे हा मार्ग चौपटीकरणासाठी पात्र ठरेल.
एन एच-160 ए हा संबंधित विभाग, जो त्रिंबकहून पश्चिमेकडे मानोर आणि पालघरकडे जातो, एन एच-160 एला दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (एनई -4), एन एच-48 आणि पश्चिम किनारपट्टी तसेच पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांशी जोडतो. सद्यस्थितीत या मार्गावर सुमारे 4,500 प्रवाशी वाहन प्रति दिन वाहतूक आहे, परंतु मध्यवर्ती मार्ग असलेल्या रस्त्याचे दुहेरीकरणासह सुधारणा झाल्यास मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा प्रवास अधिक सुरळीत होईल. तसेच, मानोर ते पालघर विभाग शहरी विस्तारातून जातो, जिथे सुमारे 12,000 प्रवाशी वाहन प्रति दिन वाहतूक आहे. या शहरी विभागात वाहतुकीला अधिक सुरळीत करण्यासाठी चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.
हा प्रकल्प पीएम गतीशक्तीच्या तत्त्वानुसार प्रस्तावित केला आहे आणि यामुळे महाराष्ट्र राज्यातील 6 पीएम गतीशक्ती आर्थिक नोड्स, 1 सामाजिक नोड आणि 8 लॉजिस्टिक नोड्स जोडले जातील. यामुळे देशाच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स वर सकारात्मक परिणाम होईल.
प्रकल्प पूर्ण झाल्यावर, यामुळे वाहतुकीचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुरक्षित होईल, प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होईल आणि वाहन ऑपरेटिंग खर्च देखील घटेल. तसेच, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत आदिवासी भागातील मुलभूत पायाभूत सुविधा सुधारल्या जातील, ज्यामुळे एकूण आर्थिक विकासात योगदान मिळेल. प्रकल्पामुळे अंदाजे 19.98 लाख व्यक्ती-दिवसांचे थेट रोजगार आणि 24.86 लाख व्यक्ती-दिवसांचे अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच मार्गावर अतिरिक्त आर्थिक क्रियाकलाप देखील वाढेल.
कोरिडॉर नकाशा :

Project Details
|
Feature
|
Details
|
|
Project Name
|
Rehabilitation and upgradation of Ghoti – Trimbak (Mokhada) – Jawhar – Manor – Palghar section of NH-160A to 2 Lane /4 Lane with paved shoulder configuration and in the state of Maharashtra on Engineering, Procurement and Construction (EPC) Mode.
|
|
Corridor
|
Sinnar to Palghar NH 160A
|
|
Length (km)
|
154.635
|
|
Total Civil Cost (Rs Cr.)
|
2594.49
|
|
Land Acquisition Cost (Rs Cr.)
|
725.89
|
|
Total Capital Cost (Rs Cr.)
|
3320.38
|
|
Mode
|
Engineering, Procurement and Construction (EPC) Mode
|
|
Major Roads Connected
|
Expressways: Delhi–Mumbai Expressway (NE-4) and Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg
National Highways: NH-848 and NH-48.
State Highways – SH-04, SH-73, SH-76, SH-77, SH-78 and SH-30
|
|
Economic / Social / Transport Nodes Connected
|
06 PM Gati Shakti Economic Nodes:
02 SEZs- Tarapur & Boisar, 02 Industrial Parks- Palghar & Mokhada, 02 Industrial Co-Operative Estates- Wada & Tarapur,
07 Social Nodes:
1 Tribal district- Palghar, 06 Tourist Places- Trimbakeshwar, Jawhar Rajwada, Vaitarna River, Kevla Beech, Arnala Fort, Tungeshwar Sanctuary),
08 logistics nodes:
03 Major Railway Station- Palghar Nashik & Shirdi, 03 Airport- Ozar, Shirdi & Mumbai, 02 Ports- Vadhavan & JNPT
|
|
Major Cities / Towns Connected
|
Trimbak (Mokhada), Jawhar, Manor, Palghar, Mumbai, Nashik
|
|
Employment Generation Potential
|
~19.98 lakh person-days of direct employment
~24.86 lakh person-days of indirect employment
|
|
Annual Average Daily Traffic (AADT) in FY-25
|
Ghoti – Trimbak section:
6,700 PCU/day
Trimbak (Mokhada) – Manor section:
4,323 PCU/day
Manor – Palghar section:
12,455 PCU/day
|
***
हर्षल आकुडे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2228154)
अभ्यागत कक्ष : 77