पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात कोईम्बतूर, छत्तीसगड, गुजरात आणि आसाममधील विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाची क्षणचित्रे केली सामायिक
Posted On:
10 FEB 2026 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 मधील परीक्षा पे चर्चा (PPC) या कार्यक्रमाच्या 9 व्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागादरम्यान कोईम्बतूर, छत्तीसगड, गुजरात आणि आसाममधील एक्झाम वॉरियर्स (Exam Warriors) सोबत अनौपचारिक संवाद साधला. परीक्षा पे चर्चाच्या या विशेष आवृत्तीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित केला गेल्याचे नमूद केले.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
तमिळनाडूतील कोईम्बतूर इथे #ParikshaPeCharcha26 दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हा एक अभूतपूर्व अनुभव होता. स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते स्वयंशिस्त आणि विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नांपर्यंत, आजच्या युवा पिढीची उत्सुकता आणि विचारांमधील स्पष्टता उत्कृष्ट आहे.
छत्तीसगडमधील विद्यार्थ्यांशी #ParikshaPeCharcha26 दरम्यान झालेला संवाद, ही पिढी किती उत्सूक, विचार करणारी आणि जागरूक आहे हे जाणवून देणारा ठरला. अभ्यास आणि खेळ यांचा समतोल राखण्यापासून ते पर्यावरणीय दक्षता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रश्नांनी त्यांच्या विचारांमधील स्पष्टता अधोरेखित केली.
गुजरातमध्ये झालेली #ParikshaPeCharcha26 परीक्षेच्या तयारीच्याही पलिकडची होती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमधून आत्मविश्वासाने शिकण्याची आणि प्रगती करण्याची तीव्र इच्छा दिसून आली. कठीण प्रसंगात दडपणाचे व्यवस्थापन करणे, शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आणि अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने संवाद साधला. इतकेच नाही तर त्यांनी वारली, पिठोरा आणि लिप्पन कलेचे सुंदर दर्शनही घडवले.
तणावाचे नियोजन आणि इतरांशी होणारी तुलना टाळण्यापासून ते आत्मविश्वास निर्माण करणे आणि आरोग्यदायी दिनचर्या जोपासण्यापर्यंत, आसाममधील विद्यार्थ्यांसोबतच्या #ParikshaPeCharcha26 च्या सत्रात सर्वच विषयांचा अंतर्भाव होता. परीक्षेत चांगली कामगिरी करण्याची त्यांची आकांक्षा आणि त्याच वेळी आपल्या मुळांशी तसेच संस्कृतीशी जोडलेले राहण्याची त्यांची ओढ यातून स्पष्टपणे दिसून आली.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2226011)
अभ्यागत कक्ष : 9