अर्थ मंत्रालय
2030–31 पर्यंत भारताचे कर्ज-ते-जीडीपी प्रमाण 50 टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज
सुधारित अंदाज 2025–26 नुसार वित्तीय तूट जीडीपीच्या 4.4 टक्क्यांवर कायम
अर्थसंकल्पीय अंदाज 2026–27 अंतर्गत वित्तीय तूट 4.3 टक्के
सुधारित अंदाज 2025–26 नुसार एकूण 49.6 लाख कोटी रुपयांच्या खर्चापैकी भांडवली खर्च 11 लाख कोटी रुपये
केंद्राची करप्राप्ती 26.7 लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज
Posted On:
01 FEB 2026 2:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2026
आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 सादर करताना केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सामाजिक गरजांकडे दुर्लक्ष न करता सरकारने सातत्याने आपली वित्तीय वचनपूर्ती केली आहे. याच अनुषंगाने, अर्थसंकल्पीय अंदाज 2026–27 मध्ये देशाचे कर्ज-ते-जीडीपी प्रमाण 55.6 टक्के राहील, असा अंदाज आहे, तर सुधारित अंदाज 2025–26 मध्ये हे प्रमाण 56.1 टक्के होते. कर्ज-ते-जीडीपी प्रमाणात होणारी घट व्याजाचा खर्च कमी होईल आणि त्यामुळे प्राधान्य क्षेत्रांतील खर्चासाठी हळूहळू अधिक संसाधने उपलब्ध होतील.
वित्तीय तूट

कर्ज लक्ष्यीकरणासाठी महत्त्वाचे कार्यकारी साधन म्हणून वित्तीय तुटीचा उल्लेख करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की, आर्थिक वर्ष 2021–22 मध्ये निश्चित केलेले 2025–26 पर्यंत वित्तीय तूट जीडीपीच्या 4.5 टक्क्यांखाली आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. सुधारित अंदाज 2025–26 मध्ये वित्तीय तूट अर्थसंकल्पीय अंदाज 2025–26 प्रमाणेच जीडीपीच्या 4.4 टक्के राहील. कर्ज एकत्रीकरणाच्या नव्या वित्तीय शिस्तीच्या चौकटीत, 2026–27 च्या अंदाजपत्रक अंदाजात वित्तीय तूट जीडीपीच्या 4.3 टक्के राहील, असा अंदाज आहे.
सुधारित अंदाज 2025–26
सुधारित अंदाज 2025–26 अंतर्गत बिगर-कर्ज प्राप्ती 34 लाख कोटी रुपये असून, त्यामध्ये केंद्र सरकारची निव्वळ करप्राप्ती 26.7 लाख कोटी रुपये आहे.
एकूण खर्चाचा सुधारित अंदाज 49.6 लाख कोटी रुपये असून, यापैकी अंदाजे 11 लाख कोटी रुपये भांडवली खर्चावर करण्यात आले आहेत.
अर्थसंकल्पीय अंदाज
अर्थसंकल्पीय अंदाज 2026–27 अंतर्गत बिगर-कर्ज प्राप्ती 36.5 लाख कोटी रुपये आणि एकूण खर्च 53.5 लाख कोटी रुपये असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारची निव्वळ करप्राप्ती 28.7 लाख कोटी रुपये राहील, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.
एकूण बाजार कर्ज उभारणी
वित्तीय तूट भागवण्यासाठी सरकार दिनांकित रोख्यांद्वारे 11.7 लाख कोटी रुपये उभारणार आहे. उर्वरित रक्कम लघु बचत व इतर मार्गांनी उभारली जाईल.
एकूण बाजारातून 17.2 लाख कोटी रुपये कर्ज उभारले जाण्याचा अंदाज आहे.
* * *
अंबादास यादव/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2221558)
अभ्यागत कक्ष : 115
Read this releasein:
Telugu
,
Malayalam
,
Tamil
,
Kannada
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati