पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केले 2026 च्या पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2026 7:16PM by PIB Mumbai
देशासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
विविध क्षेत्रातील या पुरस्कार विजेत्यांची उत्कृष्टता, समर्पण आणि सेवा, समाजाची वीण अधिक समृद्ध करते, असे पंतप्रधान म्हणाले. हा सन्मान त्यांच्या वचनबद्धतेची आणि उत्कृष्टतेची भावना प्रतिबिंबित करतो. ही भावना येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही त्यांनी नमूद केले.
2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करणाऱ्या 'X' या समाजमाध्यमावरील टिप्पणीला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी म्हणतात:
“आपल्या राष्ट्रासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानांबद्दल सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. विविध क्षेत्रांतील त्यांची उत्कृष्टता, समर्पण आणि सेवा, आपल्या समाजाची वीण अधिक समृद्ध करते. हा सन्मान त्यांच्या निष्ठा आणि उत्कृष्टतेच्या भावनांचे प्रतीक असून तो पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील.”
***
शैलेश पाटील/आशुतोष सावे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2218681)
आगंतुक पटल : 4