माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा चित्ररथ भारताची कथाकथन परंपरा आणि वेव्ह्ज मागील दृष्टिकोन दर्शवणार
‘ओम ते अल्गोरिथम’, हा चित्ररथ देशाची बहरणारी सर्जनशील अर्थव्यवस्था प्रतिबिंबित करतो
प्रविष्टि तिथि:
22 JAN 2026 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2026
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा “भारत गाथा: श्रुती, कृती, दृष्टी,” हा चित्ररथ प्राचीन मौखिक परंपरेपासून ते जागतिक सामग्री, आशय आणि माध्यम शक्ती म्हणून उदयास येईपर्यंतच्या भारताच्या संस्कृतीचा शक्तिशाली प्रवास दर्शवतो. हा चित्ररथ आत्मनिर्भर भारताची भावना प्रतिबिंबित करतो, त्याचबरोबर सांस्कृतिक वारशाची तंत्रज्ञान नवोन्मेषाशी सहज सांगड घालते.

श्रुती भारताच्या समृद्ध मौखिक वारशाचे प्रतीक आहे, ज्यामध्ये पिंपळाच्या झाडाखाली शिष्यांना ज्ञान देणारे गुरु दर्शवले आहे, त्यासोबत ध्वनी-लहरींचे आकृतिबंध आहेत जे ओमचा वैश्विक अनुनाद आणि ज्ञानाच्या उत्पत्तीचे प्रतिनिधित्व करतात.

कृती लिखित अभिव्यक्तीची उत्क्रांती दर्शवते, ज्यामध्ये भगवान गणेश महाभारत लिहीत आहेत. भारताच्या बौद्धिक वारशाला आकार देणारी हस्तलिखिते, कला आणि सुरुवातीच्या काळातील संवाद परंपरांद्वारे हे दाखवले आहे.

दृष्टी प्रिंट, सिनेमा, टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे भारताच्या माध्यम उत्क्रांतीचे चित्रण करते. विंटेज कॅमेरे, फिल्म रील्स, उपग्रह, वर्तमानपत्रे आणि बॉक्स ऑफिस चिन्हे यासारखे दृश्य घटक भारताच्या सांस्कृतिक अस्मितेला आकार देणाऱ्या चित्रपट निर्मात्यांच्या आणि कलाकारांच्या पिढ्यांचा सन्मान करतात. हा चित्ररथ एआय, एव्हीजीसी -एक्सआर आणि आभासी निर्मिती तंत्रज्ञानाद्वारे भविष्यासाठी तयार कथाकथन देखील अधोरेखित करते. यामाध्यमातून मंत्रमुग्ध कथाकथनाकडे होणारे संक्रमण दर्शवते.

सादरीकरण करणारे कलाकार चित्ररथाला जिवंत करतात. ही संकल्पना भारताला जागतिक आशय केंद्र म्हणून स्थान देण्याच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ध्येयाशी सुसंगत आहे, ज्याला वेव्हज 2025 मुळे बळकटी मिळाली आहे. या परिषदेने "केशरी अर्थव्यवस्थेची" सुरुवात केली ज्यामध्ये जगभरातून मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला आणि महत्त्वपूर्ण करार झाले.
हा चित्ररथ एक सांस्कृतिक घडामोडींचा कालानुक्रम आणि भविष्यातील दृष्टिकोन दर्शवतो जो भारताच्या प्राचीन ज्ञानाला त्याच्या डिजिटल भविष्याशी जोडतो.

* * *
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217512)
आगंतुक पटल : 5