मंत्रिमंडळ
2030-31 पर्यंत अटल पेन्शन योजना (एपीवाय) सुरु ठेवण्यास तसेच प्रोत्साहनात्मक आणि विकासात्मक उपक्रमांसाठी निधी सहाय्य आणि व्यवहार्यता तफावत निधी कायम ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2026 2:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज अटल पेन्शन योजना (एपीवाय) आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत चालू ठेवण्यास तसेच प्रोत्साहनात्मक आणि विकासात्मक उपक्रमांसाठी निधी सहाय्य आणि व्यवहार्यता तफावत निधी सुरु ठेवण्यास मंजुरी दिली.
अंमलबजावणी धोरण :
ही योजना सरकारच्या सहकार्याने 2030-31 पर्यंत सुरू राहील -
-
असंघटित कामगारांमध्ये जागरूकता, क्षमता बांधणीसह पोहोच वाढवण्यासाठी प्रोत्साहनात्मक आणि विकासात्मक उपक्रम.
-
व्यवहार्यता आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि योजनेची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी तफावत निधी
प्रमुख परिणाम :
-
अल्प उत्पन्न असलेल्या आणि असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांसाठी वृद्धापकाळात उत्पन्न सुरक्षा सुनिश्चित करते.
-
आर्थिक समावेशकता वाढवते आणि भारताला पेन्शन-आधारित समाजात परिवर्तित होण्यासाठी सहाय्य पुरवते .
-
शाश्वत सामाजिक सुरक्षा प्रदान करून विकसित भारत @2047 च्या स्वप्नाला बळ देते
पार्श्वभूमी :
-
प्रारंभ : असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात उत्पन्न सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने 9 मे 2015 रोजी अटल पेन्शन योजना (एपीवाय ) सुरू करण्यात आली.
-
योजनेची वैशिष्ट्ये: एपीवाय वयाच्या 60 व्या वर्षापासून योगदानाच्या आधारे दरमहा 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत किमान पेन्शनची हमी देते.
-
प्रगती: 19 जानेवारी 2026 पर्यंत,8.66 कोटींहून अधिक सदस्यांची नोंदणी झाली असून एपीवाय भारताच्या समावेशक सामाजिक सुरक्षा चौकटीचा एक आधारस्तंभ बनला आहे.
-
विस्ताराची आवश्यकता: योजनेची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता, क्षमता निर्मिती आणि व्यवहार्यता तफावत भरून काढण्यासाठी सातत्यपूर्ण सरकारी पाठिंबा आवश्यक आहे.
नेहा कुलकर्णी / सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216855)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam