भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

भारतीय निवडणूक आयोगाकडून 21 ते 23 जानेवारी दरम्यान लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन विषयावर आयआयसीडीईएम 2026 परिषदेचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 19 JAN 2026 8:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026

भारतीय निवडणूक आयोग (ईसीआय) पहिल्या आयआयसीडीईएम 2026  अर्थात लोकशाही व निवडणूक व्यवस्थापनविषयक भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी सज्ज झाला आहे. ‘इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट’ (आयआयआयडीईएम) च्या वतीने भारत मंडपम, नवी दिल्ली इथे आयोजित ही तीन दिवसीय परिषद 21 जानेवारी पासून सुरू होणार आहे.

1. आयआयसीडीईएम 2026 ही लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात भारतात होत असलेली सर्वात मोठी जागतिक परिषद ठरणार आहे. जगभरातील 70 हून अधिक देशांचे सुमारे 100 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी, भारतातील परदेशी संस्था आणि शैक्षणिक व प्रात्यक्षिक क्षेत्रांत निवडणूक विषयावर कार्यरत तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.

2. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी हे प्रतिनिधींचे स्वागत करतील आणि 21 जानेवारी 2026 रोजी उद्घाटन सत्रात परिषदेची सुरुवात करतील.

3. या तीन दिवसीय कार्यक्रमात निवडणूक व्यवस्थापन संस्थांची सामान्य व पूर्णाधिवेशन सत्रे होतील. यामध्ये उद्घाटन सत्र, निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या नेत्यांचे पूर्णाधिवेशन, निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या कार्यगट बैठका, तसेच जागतिक निवडणूक विषयक मुद्दे, आंतरराष्ट्रीय निवडणूक मानकांचा नमुना आणि निवडणूक प्रक्रियेतल्या नवकल्पना व सर्वोत्तम पद्धतींवर केंद्रित विषयांवर सत्रे आयोजित केली आहेत.

4. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एकूण 36 विषयात्मक गट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक तज्ज्ञांच्या सहकार्यानेपरिषदेत सखोल चर्चांमध्ये सहभागी होतील. या चर्चांमध्ये चार भारतीय तंत्रशिक्षण संस्था (आयआयटी), सहा भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), 12  नॅशनल राष्ट्रीय विधी विद्यापीठे (एनएलयू)  आणि भारतीय व्यापक संवाद संस्था (आयआयएमसी)यांच्यासह अग्रगण्य शैक्षणिक संस्थांचा सहभाग असेल.

5. निवडणूक आयोग जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्थांसमोर असलेल्या विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी व त्यांच्यासह सहकार्य वाढविण्यासाठी 40 हून अधिक द्विपक्षीय बैठका घेणार आहे. तसेच, निवडणूकीसंबंधित सर्व माहिती व सेवांसाठी आयोगाचे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ ‘ईसीआयनेट’ची औपचारिक सुरुवात करणार आहे.

6. भारतातील निवडणुकांचे प्रचंड आयोजन व गुंतागुंतीचे दर्शन घडविणारे प्रदर्शन आणि त्याबरोबर निवडणुकीचे दोन स्तंभ — मतदार यादीची तयारी आणि प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी आयोगाने अलीकडे सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती देणारे सादरीकरणपरिषदेतील कार्यक्रमांना समांतर आयोजित करण्यात येईल.

7.या जगातील सर्वात मोठी निवडणूक लोकसभा 2024 च्या अंमलबजावणीचे दर्शन घडविणारी माहितीपट मालिका “इंडिया डिसाईड्स” आयआयसीडीईएम 2026 च्या पहिल्या दिवशी प्रदर्शित केली जाईल.

नेहा कुलकर्णी/रेश्मा जठार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2216273) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Malayalam , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada