गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरपूर्वक अभिवादन केले आहे आणि राष्ट्रीय युवा दिनानिमीत्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत
ध्येयप्राप्ती होईपर्यंत कधीच थांबू नये ही स्वामी विवेकानंद यांची शिकवण युवापिढीमध्ये कर्तव्यभावना आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करते आणि विकसित भारताच्या निर्मितीला गती देते
स्वामी विवेकानंद यांनी देशातील युवकांना ज्ञान परंपरा, तत्त्वज्ञान आणि अध्यात्माशी जोडले आणि त्याचा विस्तार जागतिक व्यासपीठापर्यंत केला
स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून समाजसेवेचे आदर्श प्रस्थापित केले
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2026 11:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2026
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरपूर्वक अभिवादन केले आहे आणि राष्ट्रीय युवा दिनानिमीत्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ध्येयप्राप्ती होईपर्यंत कधीच थांबू नये ही स्वामी विवेकानंद यांची शिकवण युवापिढीमध्ये कर्तव्यभावना आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करत आहे आणि विकसित भारताच्या उभारणीला गती देत आहे, असे ते म्हणाले.
एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये अमित शाह यांनी लिहिले आहे: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि राष्ट्रीय युवादिनानिमित्त मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. स्वामी विवेकानंद यांनी देशातील युवकांना ज्ञान परंपरा, तत्त्वज्ञान आणि अध्यात्माशी जोडले आणि त्याचा विस्तार जागतिक व्यासपीठापर्यंत केला. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून समाजसेवेचे आदर्श प्रस्थापित केले. ध्येयप्राप्ती होईपर्यंत कधीच थांबू नये ही स्वामी विवेकानंद यांची शिकवण युवापिढीमध्ये कर्तव्यभावना आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करते आणि विकसित भारताच्या निर्मितीला गती देते.
नेहा कुलकर्णी /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214143)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam