पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फलनिष्पत्तीची यादी : जर्मनीचे चॅन्सलर यांचा भारत दौरा (12-13 जानेवारी 2026)

प्रविष्टि तिथि: 12 JAN 2026 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2026

I. करार / सामंजस्य करार

अ. क्र.

दस्तऐवज / करार

क्षेत्र

1.

द्विपक्षीय संरक्षण औद्योगिक सहकार्य बळकट करण्याबाबतचे संयुक्त इरादा पत्र

संरक्षण आणि सुरक्षा

2.

भारत-जर्मनी संयुक्त आर्थिक आणि गुंतवणूक समितीचा भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या स्थापनेच्या माध्यमातून द्विपक्षीय आर्थिक सहकार्य मजबूत करण्याबाबतचे संयुक्त इरादा पत्र

व्यापार आणि अर्थव्यवस्था

3.

भारत-जर्मनी सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारीबाबतचे संयुक्त इरादा पत्र

महत्वपूर्ण  आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान

4.

अत्यावश्यक खनिजांच्या क्षेत्रातील सहकार्याबाबतचे संयुक्त इरादा पत्र

महत्वपूर्ण  आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान

5.

दूरसंचार क्षेत्रातील सहकार्याबाबतचे संयुक्त इरादा पत्र

महत्वपूर्ण  आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान

6.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था तसेच इन्फिनिऑन टेक्नॉलॉजीज एजी यांच्यातील सामंजस्य करार

अत्यावश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान

7.

अखिल  भारतीय आयुर्वेद संस्था आणि जर्मनीतील चॅरिटे युनिव्हर्सिटी यांच्यातील सामंजस्य करार

पारंपारिक औषधे

8.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ आणि जर्मनीची तांत्रिक व वैज्ञानिक वायू आणि पाणी उद्योग संघटना यांच्यातील सामंजस्य करार

नवीकरणीय ऊर्जा

9.

हरित अमोनियासाठी एएम ग्रीन ही भारतीय कंपनी आणि युनिपर ग्लोबल कमोडिटीज या जर्मन कंपनीतील खरेदी करार

हरित हायड्रोजन

10.

जैवअर्थव्यवस्था क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी संयुक्त सहकार्यासाठीचे इरादा पत्र

विज्ञान आणि संशोधन

11.

भारत-जर्मनी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राचा कार्यकाळ वाढवण्याबाबतचे संयुक्त इरादा पत्र

विज्ञान आणि संशोधन

12.

उच्च शिक्षणाबाबतचा भारत-जर्मनी मार्गदर्शक आराखडा

शिक्षण

13.

आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांच्या न्याय्य आणि शाश्वत भरतीसाठी जागतिक कौशल्य भागीदारीच्या अटी शर्तींबाबतचे संयुक्त इरादा पत्र

कौशल्य विकास आणि गतिशीलता

14.

हैदराबाद इथल्या राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेत नवीकरणीय ऊर्जेसाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याबाबतचे संयुक्त इरादा पत्र

कौशल्य विकास आणि गतिशीलता

15.

लोथल (गुजरात) मधील राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या विकासासाठी भारत सरकारच्या  बंदरजहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालया अंतर्गत लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुल आणि जर्मनीतील ब्रेमरहेवन येथील जर्मन सागरी संग्रहालय - लाइबनिझ इन्स्टिट्यूट फॉर मॅरिटाइम हिस्ट्री यांच्यातील सामंजस्य करार

सांस्कृतिक आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध

16.

क्रीडा क्षेत्रातील सहकार्याबाबतचे संयुक्त इरादा पत्र

सांस्कृतिक आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध

17.

टपाल सेवा क्षेत्रातील सहकार्याबाबतचे संयुक्त इरादा पत्र

सांस्कृतिक आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध

18.

टपाल विभागदळणवळण मंत्रालय आणि ड्युश पोस्ट एजी यांच्यातील इरादा पत्र

सांस्कृतिक आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध

19.

हॉकी इंडिया आणि जर्मन हॉकी फेडरेशन (ड्यूशर हॉकी –बुंड ईपी)यांच्यात युवा हॉकी विकासाबाबतचा सामंजस्य करार

सांस्कृतिक आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध


II. महत्त्वाच्या घोषणा
 

अ. क्र.

घोषणा

क्षेत्र

20.

भारतीय पारपत्र धारकांसाठी जर्मनीमार्गे प्रवास करताना व्हिसा-मुक्त प्रवासाची घोषणा

दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध

21.

ट्रॅक 1.5 परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संवाद यंत्रणेची स्थापना

परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा

22.

भारत प्रशांत क्षेत्रासंबंधी द्विपक्षीय संवाद यंत्रणेची स्थापना

भारत प्रशांत क्षेत्र

23.

भारत-जर्मनी डिजिटल संवाद (2025-2027) कार्ययोजनेची स्वीकृती

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष

24.

नवीकरणीय ऊर्जाहरित हायड्रोजनपीएम ई-बस सेवा आणि हवामान अनुकूल शहरी पायाभूत सुविधा यांसारख्या प्राधान्यक्रमाच्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी भारत आणि जर्मनी यांच्यातील हरित आणि शाश्वत विकास भागीदारी  (जीएसडीपीया प्रमुख द्विपक्षीय भागिदारी अंतर्गत 1.24 अब्ज युरोच्या नवीन निधी वचनबद्धतेची घोषणा

हरित आणि शाश्वत विकास

25.

नवीकरणीय ऊर्जेतील गुंतवणुकीसाठी भारत-जर्मनी व्यासपीठाअंतर्गत बॅटरी साठवणूक कार्यकारी गटाचा प्रारंभ

हरित आणि शाश्वत विकास

26.

भारत-जर्मनी त्रिमितीय विकास सहकार्यांतर्गत घाना (बांबूची रचना आणि प्रक्रियेसाठी डिजिटल तंत्रज्ञान केंद्र)कॅमेरून (देशभरातील बटाटा बियाणे विषयक नवोन्मेषासाठी हवामान अनुकूल आरएसी तंत्रज्ञान प्रयोगशाळा) आणि मलावी (महिला आणि तरुणांसाठी कृषी मूल्य साखळीतील तांत्रिक नाविन्य आणि उद्योजकता केंद्र) मधील प्रकल्पांची व्याप्ती वाढवणे

 

हरित आणि शाश्वत विकास

27.

अहमदाबादमध्ये जर्मनीचा   मानद वाणिज्य दूतावास सुरु करणे

सांस्कृतिक आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध

निलीमा ‍चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2213876) आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Kannada , Malayalam