शिक्षण मंत्रालय
‘परीक्षा पे चर्चा’ने प्रस्थापित केला तीन कोटींहून अधिक नोंदणीचा नवा विक्रम
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2025 5:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक असलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’साठी 30 डिसेंबर 2025 पर्यंत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मिळून तीन कोटींहून अधिक नावनोंदणी झाली आहे. या उपक्रमाचा हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आणि परीक्षांकडे सकारात्मक व आत्मविश्वासाने पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्यात मिळविलेल्या यशाचे प्रतिबिंब या प्रचंड प्रतिसादातून दिसून आले आहे. सहभागाचा हा व्यापक स्तर ‘परीक्षा पे चर्चा’चे जनचळवळीत रुपांतर झाल्याचे दर्शवतो. या उपक्रमाने देशभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांवर मोठा प्रभाव निर्माण केला आहे.
‘परीक्षा पे चर्चा 2026’ साठी ऑनलाइन नोंदणी 1 डिसेंबर 2025 पासून मायजीओव्ही पोर्टलवर सुरू झाली. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत दरवर्षी आयोजित केला जाणारा हा उपक्रम आता शिक्षण आणि संवादाचा एक बहुप्रतिक्षित उत्सव बनला असून, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणतो.
‘परीक्षा पे चर्चा 2026’ मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर नोंदणी करा
🔗 https://innovateindia1.mygov.in/
* * *
निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210210)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
Assamese
,
Bengali-TR
,
Odia
,
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam