Posted On:
28 DEC 2025 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी रतन टाटा जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. सचोटी आणि करुणेच्या मुद्यांवर आधारित भारतीय उद्योगाला एक नवीन आकार देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी रतन टाटा यांचा गौरव केला.
‘X’ या समाज माध्यमावरील एका संदेशात, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले,
“रतन टाटा जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. त्यांनी सचोटी आणि करुणेच्या बळावर भारतीय उद्योगाला एक नवीन आकार दिला. स्वदेशी उद्योग उभारण्यापासून ते निःस्वार्थ परोपकारापर्यंत, खरे यश राष्ट्राच्या सेवेत आहे, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचा वारसा आत्मनिर्भर सदैव भारताला प्रेरणा देत राहील.”
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai