गृह मंत्रालय
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा, ओडिशातील कंधमाल येथे राबवण्यात आलेल्या मोठ्या कारवाईत गणेश उईके याच्यासह
सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान
Posted On:
25 DEC 2025 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
ओडिशातील कंधमाल येथे करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईत नक्षलवाद्यांच्या संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य गणेश उईके याच्यासह सहा नक्षलवादी आतापर्यंत ठार झाले असून नक्षलमुक्त भारताच्या दिशेने गाठलेला हा उल्लेखनीय टप्पा आहे.
या संदर्भात 'एक्स' समाजमाध्यमावर गृहमंत्री कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, "नक्षलमुक्त भारताच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा. ओडिशातील कंधमाल येथे करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईत नक्षलवाद्यांच्या संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य गणेश उईके याच्यासह सहा नक्षलवादी आतापर्यंत ठार झाले. या मोहिमेतील या मोठ्या यशाबरोबरच, ओडिशा आता नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे. 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा निर्धार आहे."
* * *
निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2208537)
अभ्यागत कक्ष : 50
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam