गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान, भाजप संस्थापक, भारतरत्न, आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने वाहिली आदरांजली


भाजपच्या स्थापनेद्वारे, अटलजींनी भारतीय राजकारणाला एक राजकीय पर्याय उपलब्ध करून दिला जो राष्ट्रीय हित व सांस्कृतिक राष्ट्रवादाला प्राधान्य देत होता

भारताला अणुशक्ती म्हणून जगासमोर आणणे असो किंवा सुशासन साकारणे असो, त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने देशाला एक असे प्रशासन मॉडेल सादर केले ज्याने वारसा व विज्ञान दोन्ही एकाच वेळी विकसित केले

अटलजी हे भारतीय राजकारणातील एक शक्तिशाली व अविस्मरणीय व्यक्तिमत्व आहेत, जे सार्वजनिक सेवेसाठी तसेच संघटनात्मक ताकदीसाठीच्या त्यांच्या समर्पणासाठी ओळखले जातात

प्रविष्टि तिथि: 25 DEC 2025 2:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025

 

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान तसेच भाजपचे संस्थापक, भारतरत्न, आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने आदरांजली वाहिली.

'एक्स' वरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भाजपच्या स्थापनेद्वारे अटलजींनी भारतीय राजकारणाला राष्ट्रीय हित व सांस्कृतिक राष्ट्रवादाला प्राधान्य देणारा राजकीय पर्याय उपलब्ध करून दिला. ते म्हणाले की, भारताला अणुशक्ती म्हणून जगासमोर आणणे असो किंवा सुशासन साकारणे असो, त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने देशाला एक असे प्रशासन मॉडेल सादर केले ज्याने वारसा व विज्ञान दोन्ही एकाच वेळी विकसित केले. शाह म्हणाले की, अटलजी हे भारतीय राजकारणातील एक शक्तिशाली व अविस्मरणीय व्यक्तिमत्व आहे, जे सार्वजनिक सेवेसाठी आणि संघटनात्मक ताकदीसाठीच्या त्यांच्या समर्पणासाठी ओळखले जातात.

 

* * *

शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2208475) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam