पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान यांची नाताळच्या सकाळच्या सेवेला उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2025 11:33AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील 'द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन' येथे झालेल्या नाताळ सकाळच्या सेवेला उपस्थिती लावली. "या सेवेतून प्रेम, शांती आणि करुणेचा कालातीत संदेश प्रतिबिंबित झाला. नाताळची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि सद्भावना निर्माण करो", असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“दिल्लीतील द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे नाताळ सकाळच्या सेवेला उपस्थित राहिलो. या सेवेने प्रेम, शांती आणि करुणेचा कालातीत संदेश प्रतिबिंबित केला. नाताळची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि सद्भावना निर्माण करो."
"द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे झालेल्या ख्रिसमस सकाळच्या सेवेची एक झलक"
नाताळ नवीन आशा, बंधुता आणि दयाळूपणाची सामायिक वचनबद्धता घेऊन येवो.
“द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमधील नाताळ सकाळच्या सेवेतील काही ठळक बाबी येथे आहेत.”
* * *
शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208397)
आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam