पंतप्रधान कार्यालय
पारंपरिक औषधोपचारांवर आधारित जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या वैश्विक परिषदेच्या समारोप समारंभातील काही क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
19 DEC 2025 10:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 19 डिसेंबर 2025
पारंपरिक औषधोपचारांवर आधारित जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या वैश्विक परिषदेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या समारोप समारंभातील काही क्षणचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहेत.
'एक्स'वर पाठवलेल्या वेगवेगळ्या संदेशांमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले;
“पारंपरिक औषधोपचारात, आपण विद्यमान गरजांच्या पलीकडे जाऊन आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे आरोग्य आणि स्वास्थ्याची देखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर आहे.”
“बहुविध स्तरांवर केलेल्या निरंतर प्रयत्नांच्या माध्यमातून, भारत हे दाखवून देत आहे की गंभीर परिस्थितीत देखील, पारंपरिक औषधे परिणामकारक आणि अर्थपूर्ण भूमिका निभावतात.”
“पारंपरिक औषधोपचारांवर आधारित जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या वैश्विक परिषदेतील प्रदर्शनात जगभरातील वनौषधी आणि प्राचीन वैद्यकीय प्रणाली मांडण्यात आल्या होत्या, त्यातून त्यांची वाढती समर्पकता तसेच आधुनिक आरोग्यसेवा क्षेत्रातील क्षमता अधोरेखित झाली.
@WHO”
“पारंपरिक औषधोपचारांवर आधारित जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या वैश्विक परिषदेत अश्वगंधा या वनस्पतीवर आधारित विशेष टपाल तिकीट जारी केले
@WHO”
“जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांच्याशी आज विचारपूर्ण चर्चा झाली. समग्र आरोग्य, प्रतिबंधात्मक सेवा आणि स्वास्थ्य यांना चालना देण्यात पारंपरिक औषधोपचारांमध्ये असलेल्या अमर्याद क्षमतेवर आम्ही चर्चा केली. पुराव्यावर आधारित उपचार पद्धती आणि पारंपरिक औषधोपचार क्षेत्रातील जागतिक सहकार्य यांचे महत्त्व देखील आम्ही अधोरेखित केले.
@WHO
@DrTedros”
***
नितीन फुल्लुके / संजना चिटणीस/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2206903)
आगंतुक पटल : 8