पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियातील अदिस अबाबा येथील अदवा विजय स्मारकावर वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
17 DEC 2025 3:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अदिस अबाबा येथील अदवा विजय स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. हे स्मारक 1896 च्या अदवाच्या लढाईत आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर इथिओपियन सैनिकांना समर्पित आहे. हे स्मारक अदवाच्या नायकांच्या अमर आत्म्याला आदरांजली असून ते इथिओपियाच्या स्वातंत्र्य, सन्मान आणि जिद्दीच्या गौरवशाली वारशाचे दर्शन घडवते.
पंतप्रधानांच्या या स्मारक भेटीमुळे भारत आणि इथिओपिया यांच्यातील एक विशेष ऐतिहासिक संबंध अधोरेखित होतो. हे नाते आजही दोन्ही देशांचे लोक जपत आहेत.
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2205196)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam