पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इथिओपियामध्ये स्नेहमय स्वागत

Posted On: 16 DEC 2025 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या इथिओपियाच्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यावर अदिस अबाबा येथे पोहोचले. विमानतळावर आगमन झाल्यावर इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचे स्नेहपूर्ण आणि रंगतदार स्वागत करण्यात आले.

भारत आणि इथिओपियाच्या नागरिकांमधील दृढ संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक संबंध प्रस्थापित झाले आहेत. इथिओपियन नेतृत्वाची ही भावना, ग्लोबल साउथ मधील भागीदार म्हणून दोन्ही देश परस्परांना देत असलेले महत्व प्रतिबिंबित करते.

सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2204896) अभ्यागत कक्ष : 43