पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्रीक शिक्षणतज्ञांबरोबर भेट

प्रविष्टि तिथि: 25 AUG 2023 10:31PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी अथेन्स येथील अथेन्स विद्यापीठातील संस्कृत आणि हिंदीचे प्राध्यापक तसेच भारत-विद् प्रोफेसर दिमित्रीओस वास्सालियाडिस यांची भेट घेतली. यावेळी अथेन्स विद्यापीठाच्या सामाजिक धर्मशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अपोस्टोलोस मिशेलिडिस यांची भेट घेतली.

दोन्ही प्राध्यापकांनी पंतप्रधानांना भारतीय धर्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीवरील त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.

या चर्चेत भारतीय आणि ग्रीक विद्यापीठांमधील शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या संभाव्यतेवर तसेच भारत-ग्रीस सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर भर देण्यात आला. 

***

AshishSangle/ShraddhaMukhedkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2204470) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam