पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अथेन्समधील भारतीय समुदायाशी साधला संवाद

Posted On: 25 AUG 2023 10:37PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी अथेन्स येथील अथेन्स कॉन्झर्व्हेटॉयरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले.

पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात, भारतामध्ये सध्या होत असलेल्या अभूतपूर्व परिवर्तनावर आणि विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी चांद्रयान मोहिमेच्या यशाचे कौतुक केले.

ग्रीसमधील भारतीय समुदायाने भारत-ग्रीस संबंधांना बहुआयामी बनवण्यात दिलेल्या योगदानावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला तसेच या समुदायाने भारताच्या विकासगाथेचा भाग बनावे, असे आवाहनही केले.

***

आशिष सांगळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2203685) अभ्यागत कक्ष : 20