पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2025 8:48AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, बौद्धिक व्यक्तिमत्व आणि राजकारणी म्हणून त्यांचे स्मरण करत पंतप्रधानांनी नमूद केले आहे, की राजाजी हे विसाव्या शतकातील सर्वात कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या विचारवंतांपैकी एक आहेत, ज्यांनी मूल्यनिर्मिती आणि मानवाच्या सन्मानाचे जतन करण्यावर विश्वास ठेवला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि सार्वजनिक जीवनात त्यांच्या योगदानाचे राष्ट्र सदैव कृतज्ञतेने स्मरण करत राहील,असे पंतप्रधान म्हणाले.
एक्स मंचावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:
स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, बौद्धिक व्यक्तिमत्व आणि राजकारणी... सी. राजगोपालाचारी यांची आठवण झाली की मनात येणारी काही विशेषणे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. ते विसाव्या शतकातील सर्वात कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या विचारवंतांपैकी एक होते; ज्यांनी मूल्यनिर्मिती आणि मानवाच्या सन्मानाचे रक्षण यांना महत्त्व दिले. आपले राष्ट्र त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचे नेहमीच स्मरण करत राहील.
राजाजींच्या जयंतीनिमित्त, अभिलेखागारातील काही काही महत्त्वाची सामग्री सामायिक करत आहे, ज्यामध्ये तरुण राजाजींचा फोटो, कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना, 1920 च्या दशकातील स्वयंसेवकांसोबतचे त्यांचे छायाचित्र आणि गांधीजी तुरुंगात असल्याने राजाजींनी संपादित केलेल्या 1922 सालच्या यंग इंडिया आवृत्ती यांचा मी समावेश करत आहे.
***
NehaKulkarni/SampadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201308)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam