पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मायक्रोसॉफ्टच्या आशियातील सर्वात मोठ्या गुंतवणुकीचे केले स्वागत; भारताला जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र म्हणून स्थान
कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जग भारताबद्दल आशावादी आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2025 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्यासोबत झालेल्या फलदायी चर्चेनंतर, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील भारताच्या नेतृत्वाबद्दल आशावाद व्यक्त केला.
आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक भारतात करण्याच्या मायक्रोसॉफ्टच्या घोषणेचे पंतप्रधानांनीस्वागत केले. या निर्णयामुळे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानासाठी विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची वाढती भूमिका अधोरेखित केली.
सत्या नडेला यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
“कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत बोलायचे झाले, तर जग भारताबद्दल आशावादी आहे!
सत्या नडेला यांच्यासोबत अतिशय फलदायी चर्चा झाली. मायक्रोसॉफ्ट आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक भारतात करणार असल्याचा मला आनंद आहे.
भारताचा युवा वर्ग या संधीचा नवोन्मेषासाठी उपयोग करेल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची शक्ती अधिक चांगल्या जगाच्या उभारणीसाठी उपयोगात आणेल.”
सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
(रिलीज़ आईडी: 2201148)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam