पंतप्रधान कार्यालय
नौदल दिनानिमित्त पंतप्रधानांनी भारतीय नौदलाच्या जवानांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2025 8:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या सर्व अधिकारी -जवान - कर्मचाऱ्यांना आजच्या नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपले नौदल म्हणजेच अद्वितीय साहस आणि दृढनिश्चयाचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आपल्या सागरी सीमा आणि सागरी कार्यक्षेत्राचे ते रक्षणकर्ते आहेत. मोदी म्हणाले, “आय एन एस विक्रांत वर नौदलाच्या जवानांबरोबर मी यावर्षी साजरी केलेली दिवाळी केवळ अविस्मरणीय आहे. भारतीय नौदलाला त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!”
पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात लिहिले आहे,
“भारतीय नौदलाच्या सर्व अधिकारी-जवान- कर्मचाऱ्यांना आजच्या नौदल दिनानिमित्त शुभेच्छा. आपले नौदल म्हणजेच अद्वितीय साहस आणि दृढनिश्चयाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आपल्या सागरी सीमा आणि सागरी कार्यक्षेत्राचे ते रक्षणकर्ते आहेत. गेल्या काही वर्षांत आपल्या नौदलाने आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेवर लक्ष केंद्रित केले असून आपल्या सुरक्षा व्यवस्थेत त्यामुळे खूप सुधारणा झाली आहे.
आय एन एस विक्रांत वर नौदलाच्या जवानांबरोबर मी यावर्षी साजरी केलेली दिवाळी केवळ अविस्मरणीय होती. भारतीय नौदलाला त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!”
***
नितीन फुल्लुके/उमा रायकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2198613)
आगंतुक पटल : 7