पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी आयआयटी (इंडियन स्कूल ऑफ माईन्स) धनबादच्या शताब्दी स्थापना सप्ताहामध्ये उद्घाटनपर भाषण
आयआयटी धनबादला भारताच्या महत्त्वपूर्ण, दुर्मिळ खनिज धोरणाचे केंद्रस्थान बनवण्याचे डॉ. पी. के. मिश्रा यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2025 9:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी आज धनबादच्या आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयएसएम-इंडियन स्कूल ऑफ माईन्स) शताब्दी स्थापना सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात भाषण केले. प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि मान्यवर पाहुण्यांशी त्यांनी संवाद साधला. 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या प्रवासात आयआयटी धनबादची महत्त्वपूर्ण भूमिका राहील असे ते म्हणाले.
डॉ. पी. के. मिश्रा यांना यावर्षीच्या सुरुवातीला आयआयटी (आयएसएम) धनबादकडून विज्ञान शाखेतील डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
100 वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेच्या स्थापना दिनात सहभागी होता आले याबद्दल मिश्रा यांनी आनंद व्यक्त केला. खाणकाम, ऊर्जा, पृथ्वीविज्ञान आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्या अभियांत्रिकी क्षेत्रातील संस्थेचे योगदान मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. , आशियातील खनिज शिक्षणात आयआयटी धनबाद ही संस्था अग्रणी राहिली आहे आणि सातत्याने राष्ट्रीय संस्थांना तज्ज्ञ पुरवत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनात आपल्या भूमिकेचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी संस्थेला केले.
पंतप्रधानांच्या भारत 2047 च्या दृष्टिकोनावर मिश्रा यांनी प्रकाश टाकला. विकसित देशाचा दर्जा मिळवणे, तसेच निसर्ग आणि संस्कृती यांचा समतोल राखणे तसेच विज्ञान व तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्व करणे, हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
सुवर्णा बेडेकर /प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2198511)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam