पंतप्रधान कार्यालय
महिला शक्ती भारताच्या भवितव्याच्या कशा प्रकारे केंद्रस्थानी आहे, त्याबद्दलचा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2025 5:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला, ज्यामध्ये 'महिला शक्ती' भारताच्या भविष्याच्या केंद्रस्थानी कशी आहे ते सांगितले आहे. "जेव्हा भारत अमृत काळामध्ये प्रवेश करत आहे, तेव्हा हा शब्द केवळ एक घोषणा राहिलेला नाही; तर ते एक राष्ट्रीय मिशन आहे. 'वन-स्टॉप सेंटर्स'पासून ते जलदगती न्यायालयांपर्यंत, हेल्पलाईन्सपासून ते सामाजिक-सुरक्षा केंद्रांपर्यंत, 'मिशन शक्ती' अंतर्गत सरकार महिलांसाठी सन्मान आणि संधी सुनिश्चित करत आहे," असे मोदींनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या 'X' वरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:
"महिला शक्ती भारताच्या भविष्याच्या केंद्रस्थानी आहे. जेव्हा भारत अमृत काळामध्ये प्रवेश करत आहे, तेव्हा हा शब्द केवळ एक घोषणा राहिलेला नाही; तर ते एक राष्ट्रीय मिशन आहे. 'वन-स्टॉप सेंटर्स'पासून ते जलदगती न्यायालयांपर्यंत, हेल्पलाईन्सपासून ते सामाजिक-सुरक्षा केंद्रांपर्यंत, 'मिशन शक्ती' अंतर्गत सरकार महिलांसाठी सन्मान आणि संधी सुनिश्चित करत आहे.
केंद्रीय मंत्री @Annapurna4BJP यांनी केलेले हे खूप सुज्ञ आत्मनिरीक्षण आहे. नक्की वाचा!"
सुषमा काणे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2197131)
आगंतुक पटल : 7