पंतप्रधान कार्यालय
रशियाच्या अध्यक्षांचे सहाय्यक निकोलाय पात्रुशेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
दळणवळण, जहाजबांधणी आणि नील अर्थव्यवस्थेतील सहकार्य मजबूत करण्यावरील विचारांचे केले आदान प्रदान
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे पुढील महिन्यात भारतात स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
18 NOV 2025 10:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025
रशियन फेडरेशनच्या मेरीटाईम बोर्डाचे अध्यक्ष आणि रशियाच्या अध्यक्षांचे सहाय्यक निकोलाय पात्रुशेव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
त्यांनी दळणवळण, कौशल्य विकास, जहाज बांधणी आणि नील अर्थव्यवस्थेमधील सहकार्याच्या नव्या संधींसह सागरी क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर विचारांची देवाणघेवाण केली.
पंतप्रधानांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील महिन्यात भारतात त्यांचे स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले.
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2191477)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam